PAK vs ENG: फलंदाजी करण्यापूर्वीच पाकिस्तानचं WC मधील आव्हान संपुष्टात; इंग्लंडने दिलं मोठं लक्ष्य

Pakistan vs England: या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वीत पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
pakistan
pakistansaam tv news
Published On

Pakistan vs England:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ४४ वा सामना पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ९ गडी बाद ३३७ धावांचा डोंगर उभारला आहे. यासह पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

इंग्लंडने उभारला ३३७ धावांचा डोंगर..

इंग्लंडचे फसंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजांवर तुटून पडले.पाकिस्तानकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. तर जो रुट ६० धावा करत माघारी परतला. त्याने या खेळीगरदरम्यान ४ चौकार मारले. तर जॉनी बेअरस्टोने ५९ धावांचे योगदान दिले. इंग्लंडने ५० षटक अखेर ३३७ धावा केल्या आहेत.

pakistan
World Cup 2023: IND vs NED सामन्यापूर्वी संघात मोठा बदल! युवा खेळाडूची संघात एन्ट्री

पाकिस्तानचा संघ बाहेर..

पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रथम फलंदाजी करायची होती. तर प्रथम फलंदाजी करुन पाकिस्तानला मोठं आव्हान उभारायचं होतं. धावांचा बचाव करत इंग्लंडवर २८७ धावांनी विजय मिळवायचा होता. मात्र असं काही झालेलं नाही. पाकिस्तानसमोर इंग्लंडने ३३८ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

pakistan
IND vs PAK, World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार? कसं आहे पॉईंट टेबलचं समीकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com