pak vs can twitter
Sports

PAK vs CAN: पाकिस्तानचा कॅनडावर एकतर्फी विजय! सुपर ८ मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा

T-20 World Cup 2024 Super 8 Scenario: पाकिस्तान आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात कॅनडाला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. #

Ankush Dhavre

पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला आहे. सुपर ८ मध्ये जाण्यासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या सामन्यात पाकिस्तानने सर्वोत्तम खेळ केला. कॅनडाकडून फलंदाजी करताना आरोन जॉन्सनने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर कॅनडाने १०० धावांचा पल्ला गाठला. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानकडून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना कॅनडाला अवघ्या १०६ धावा करता आल्या. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १०७ धावा करायच्या होत्या. या मैदानावर धावांचा पाठलाग करणं खूप कठीण आहे. पावरप्लेच्या षटकात पाकिस्तानला ६ षटक अखेर अवघ्या २८ धावा करता आल्या. त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून १० षटकात संघाची धावसंख्या ५९ धावांवर पोहोचवली. त्यानंतर बाबर आझम १५ व्या षटकात ३३ धावा करत माघारी परतला.

पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने अर्धशतकी खेळी केली. ज्यावेळी पाकिस्तानचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता, त्यावेळी फखर जमान ४ धावा करत माघारी परतला. पाकिस्तानकडून उस्मान खानने विनिंग शॉट मारला.

सुपर ८ मध्ये जाण्याच्या आशा कायम

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत पाकिस्तानला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात अमेरिका तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या २ पराभवासह पाकिस्तानचा सुपर ८ मध्ये जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला होता. मात्र आता कॅनडाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवल्यानंतर सुपर ८ मध्ये जाण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT