PAK vs CAN: पाकिस्तानसाठी 'करो या मरो' लढत! न्यूयॉर्कची खेळपट्टी कोणासाठी ठरणार लकी?

Pakistan vs Canada Pitch Report: आज होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि कॅनडा हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
PAK vs CAN: पाकिस्तानसाठी 'करो या मरो' लढत! न्यूयॉर्कची खेळपट्टी कोणासाठी ठरणार लकी?
pak vs cangoogle

पाकिस्तान संघाला आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत एकापेक्षा एक मोठे धक्के बसले आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला भारतीय संघाने धूळ चारली. त्यामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. दरम्यान आज पाकिस्तानचा संघ कॅनडाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. हा सामना पाकिस्तान संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यात खेळपट्टी कोणाला साथ देणार? जाणून घ्या.

पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यादरम्यान होणारा सामना हा न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. याच मैदानावर पाकिस्तानला भारतीय संघाने पराभूत केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला या खेळपट्टीचा चांगलाच अंदाज आला असेल. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात एकूण १७ फलंदाज बाद झाले होते. ज्यात १५ फलंदाजांना वेगवान गोलंदाजांनी बाद केलं होतं. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही गोलंदाजांची चांदी पाहायला मिळू शकते. यासह आणखी एक लो स्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो.

PAK vs CAN: पाकिस्तानसाठी 'करो या मरो' लढत! न्यूयॉर्कची खेळपट्टी कोणासाठी ठरणार लकी?
IND vs PAK: रिझवानचा जीव थोडक्यात बचावला; सिराजच्या त्या बॉलवर नेमकं काय घडलं? - Video

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान, नसीम शाह, सॅम अयूब आणि शादाब खान.

PAK vs CAN: पाकिस्तानसाठी 'करो या मरो' लढत! न्यूयॉर्कची खेळपट्टी कोणासाठी ठरणार लकी?
IND vs PAK: 'त्याला बॅटींग तरी येते का?', पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर दिग्गज खेळाडू भडकले

कॅनडा - साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, रविंदरपाल सिंग, नवनीत धालीवाल, कलीम सना, डिलोन हेलिगर, जेरेमी गोर्डन, निखिल दत्ता, दिलप्रीत बाजवा, श्रेयस मोव्वा, ऋषिव जोशी, परगट सिंग, निकोलस किरटन, रेयानखान पठान आणि जुनेद सिद्दीकी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com