Points table saam tv
Sports

WTC Points Table: पाकिस्तानच्या विजयानं भारताचं गणित बिघडलं; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

India Position In WTC Points Table: पाकिस्तानने पहिल्याच कसोटी सामन्यात चॅम्पियन दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला. यानंतर डब्ल्यूटीसी पॉईंट्स टेबलच्या क्रमवारीत मोठा उलटफेर झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुधवारी झालेल्या २०२५-२७ च्या फेरीतील पहिल्याच कसोटी सामन्यात पाकिस्तानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेचा ९३ धावांनी पराभव केला. दोन्हीही संघांसाठी हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फेरीमधील पहिलाच सामना होता. तर मंगळवारी भारताने वेस्टइंडिज विरुद्धची कसोटी मालिका २-० ने जिंकली. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२०२७ या फेरीमधील भारताची ही पहिलीच मालिका विजय आहे.

पाकिस्तानच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाला. यामुळे भारताला धक्का बसला बसून संघाचं गणित बिघडलं आहे. या पॉईंट्स टेबलमध्ये भारत सध्या कितव्या स्थानी आहे, जाणून घेऊयात.

WTC पॉइंट्स टेबलमध्ये भारताचे स्थान

पाकिस्तानच्या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. शान मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकला. या विजयासह ते पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. तर पाकिस्तानच्या विजयामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ WTC पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तानच्या विजयाआधी तिसऱ्या स्थानावर होता. आता चौथ्या स्थानावर घसरला आहे.

points table

भारताने सातपैकी चार कसोटी जिंकल्या आहेत, दोन गमावल्या आहेत आणि एक अनिर्णित राहिला आहे. भारताचे ५२ रेटिंग गुण आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे १२ गुण आहेत. तर श्रीलंकने दोन सामने खेळले आहेत यापैकी एक सामना जिंकला आणि एक अनिर्णित राहिला आहे. १६ गुणांसह श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ सध्या WTC पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने २०२५-२०२७ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत तीन सामने खेळले आहेत, त्यापैकी तिन्ही सामने जिंकले आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाचे ३६ गुण आहेत.

पाकिस्तानने केला दक्षिण अफ्रिकेचा पराभव

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 378 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 269 धावांवर ऑलआउट झाला. पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या डावाच्या आधारे १०९ धावांची आघाडी घेतली. यजमान संघ दुसऱ्या डावात १६७ धावांवर सर्वबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी २७७ धावांचे लक्ष्य दिले. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ६०.५ षटकांत १८३ धावांवर संपुष्टात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Garje Death Case:...म्हणून मी पोलिसांना फोन केला नाही; गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, टीझरमधील सीन बघून आश्चर्यचकित व्हाल, व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma : टी २० वर्ल्डकपसाठी रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी, जय शहांची घोषणा

ICC कडून टी20 विश्वचषकाचे शेड्युल जाहीर; भारत-पाकिस्तानचा पहिला सामना कधी?

Wednesday Horoscope: चहूबाजूंनी होईल पैशाचा वर्षाव, 5 राशीं होणार मालामाल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT