PAK VS NEP Cricket Match News Saam tv
क्रीडा

PAK VS NEP Cricket Match News: कर्णधार बाबर, इफ्तिखारने नेपाळला धू-धू धुतलं; पाकिस्तानने दिलं ३४३ धावांचं आव्हान

PAK VS NEP Cricket Match News: पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत नेपाळसमोर ३४३ धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तानच्या बाबर आजम आणि इफ्तिखार अहमदने शतकी खेळी खेळली.

Vishal Gangurde

PAK VS NEP Cricket Match News: आज आशिया कप २०२३ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज पाकिस्तान आणि नेपाळमध्ये स्पर्धेचा पहिला सामना सुरु आहे. या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत नेपाळसमोर ३४३ धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तानच्या बाबर आजम आणि इफ्तिखार अहमदने शतकी खेळी खेळली. (Latest Marathi News)

पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. फखर आणि इमाल उल-हक लवकर तंबुत परतले. फखरला सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूत बाद झाला. फखरने २० चेंडूत ३ चौकार लगावत १४ धावा कुटल्या. तर इमाम सातव्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला आहे. (Latest Cricket News)

पाकिस्तानने १२ व्या षटकात ५० धावा पूर्ण केल्या. या डावात बाबर आझमने जोरदार फलंदाजी केली. बाबरनने १०९ चेंडूत १० चौकार ठोकले. या डावात बाबरने एकदिवीय सामन्यामधील १९ वं शतक ठोकलं. इफ्तिखारनेही जोरदार फलंदाजी करत शतक ठोकलं.

पाकिस्तानच्या फलंदाजांच्या आक्रमक खेळी ५० षटकात ३४२ धावा ठोकल्या. बाबरने या डावात १३१ चेंडूत १५१ धावा ठोकल्या. तर इफ्तिखार ७१ चेंडूत १०९ धावा ठोकल्या.

कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

पाकिस्तानचा क्रिकेट संघ : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद रिजवान (विकेट किपर), नसीम शाह, हारिस रऊफ, शादाब खान, आगा सलमान, मोहम्मद नवाज,इफ्तिखार अहमद, शाहीन अफरीदी,

नेपाळचा क्रिकेट संघ: कुशल भुर्टेल, आसिफ शेख (विकेट किपर), रोहित पोडेल (कॅप्टन), ललित राजबंशी, गुलसन झा, सोमपाल कामी, दीपेंद्र सिंग ऐरी, करण केसी,आरिफ शेख, कुशल मल्ला, संदीप लामिछाने

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT