आशिया चषक २०२३ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी पाकिस्तान संघात मोहम्मद रिजवान, शाहिन आफ्रिदी सारख्या इमाम उल हक सारख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम म्हणाला की, 'खेळपट्टी कोरडी आहे, त्यामुळे आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहोत. आम्ही प्लेइंग ११ ची घोषणा केली होती, यामागे काहीच कारण नव्हतं. आम्हाला केवळ खेळाडूंना विश्वास पटवून द्यायचा होता. रँकिंगमध्ये टॉपवर असल्यावर दबाव येतोच.'
तसेच नेपाळच्या कर्णधाराने नाणफेकीदरम्यान बोलताना म्हटले की, 'सर्व खेळाडू आंनदी आहेत. आशिया चषकात हा आमचा पहिलाच सामना असणार आहे. खेळपट्टी देखील फलंदाजीसाठी अनुकूल आहे.' (Latest sports updates)
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
पाकिस्तान : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, शादाब खान, आगा सलमान, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ
नेपाळ : कुशल भुर्टेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पोडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, गुलसन झा, सोमपाल कामी, दीपेंद्र सिंग ऐरी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.