Asia Cup 2023, Playing XI: पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी नेपाळ सज्ज! दोन्ही संघ या मजबूत प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

Pakistan And Nepal Playing 11: पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११.
pakistan cricket team
pakistan cricket team saam tv
Published On

Asia Cup 2023 Pakistan vs Nepal Playing 11 Prediction:

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बलाढ्य पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी नेपाळचा संघ मैदानात उतरणार आहे. हा सामना मुल्तानमध्ये रंगणार आहे.

मुख्य बाब म्हणजे वनडे फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच नेपाळचा संघ पाकिस्तानचा सामना करणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग ११.

pakistan cricket team
Asia Cup 2023: धुमधडाक्यात होणार एशिया कपची सुरूवात, सोहळ्याला 'या' सेलिब्रिटींची मांदियाळी, जाणून घ्या कोण-कोण लावणार हजेरी

किती वाजता सुरू होईल सामना?

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. यासह हा सामना डीज्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह असणार आहे.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा,शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज,, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

नेपाळ: आरिफ शेख, बी शर्की, के भुर्टेल, रोहित कुमार पोडेल (कर्णधार), दिपेंद्र सिंग ऐरी, कुशल मल्ला, अर्जुन सऊद (यष्टीरक्षक), गुलशन कुमार झा, ललित राजबंशी, संदीप लामिछाने आणि के महतो. (Latest sports updates)

pakistan cricket team
Asia Cup 2023: आशिया चषकापूर्वी रिषभ पंतची टीम इंडियात एन्ट्री! Photo होतोय व्हायरल

भारत पाकिस्तान सामना...

आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना हा बहुप्रतिक्षीत सामना असणार आहे. हा सामना येत्या २ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

संघातील यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे पाकिस्तान आणि नेपाळविरूद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाही. त्याच्याऐवजी ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते.

क्रिकेट चाहत्यांना ३ वेळेस भारत- पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळू शकते. २ सप्टेंबर रोजी होणारा सामना झाल्यानंतर हे दोन्ही संघ सुपर ४ मध्ये आमने सामने येणार आहेत. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर हे दोन्ही संघ ३ वेळेस आमने सामने येऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com