PAK vs ENG Saam TV
Sports

PAK vs ENG T20 World Cup 2022 Final: आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास विजेता कसा ठरवणार? ICC चा प्लान बी काय?

मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. पाऊस पडल्यास अंतिम सामना सोमवारी 'रिझर्व्ह डे'ला खेळवला जाईल.

साम टिव्ही ब्युरो

PAK vs ENG T20 World Cup 2022 Final: T20 विश्वचषकाचा अंतिम आज (13 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता दोन्ही संघांमधील सामना सुरू झाला. या सामन्यावर पावसाचा धोका झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विश्वचषकाचा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर काय? कारण याआधी बरेच सामने पावसामुळे रद्द झाले आणि दोन्ही संघाना एक-एक गुण देण्यात आले होते.

मेलबर्नमधील हवामान परिस्थिती

ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता पाऊस पडण्याची शक्यता 80-90% वर्तवली आहे. संपूर्ण शहरात ढगाळ वातावरण आहे. (Sports News)

पूर्व ते ईशान्येकडील वारे 15 ते 25 किमी/तास वेगाने उत्तरेकडून उत्तर-पश्चिम दिशेने वाहत आहेत. वारे सकाळी 25 ते 35 किमी/ताशी वेगाने वाहतात, नंतर संध्याकाळी 15 ते 20 किमी/ताशी कमी होतात. रविवारी पाऊस पडल्यास, T20 विश्वचषकाचा अंतिम सामना सोमवारी 'रिझर्व्ह डे'च्या दिवशी खेलवला जाईल.

मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. पाऊस पडल्यास अंतिम सामना सोमवारी 'रिझर्व्ह डे'ला खेळवला जाईल. आयसीसीने उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची व्यवस्था केली आहे. दुसरीकडे, राखीव दिवशीही पावसाने व्यत्यय आणला, तर सामन्याच्या निकालासाठी किमान 10-10 षटकांचा खेळ होणे आवश्यक आहे. म्हणजेच दोन्ही दिवशी पाऊस पडल्यास पाकिस्तान आणि इंग्लंड संघ 10-10 षटके खेळले तरच सामन्याचा निर्णय डकवर्थ लुईस नियमानुसार होईल.

पावसामुळे अंतिम सामना न झाल्यास नियमानुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. T20 आणि एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंतच्या इतिहासात कधीही संयुक्त विजेता झालेला नाही.

ICC ने बाद फेरीसाठी नवीन नियम केले आहेत. सुपर-12 दरम्यान पाऊस झाल्यास, सामन्याच्या निकालासाठी दोन्ही संघांनी 5-5 षटकांची फलंदाजी करणे आवश्यक आहे. पण उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी किमान 10-10 षटके खेळणे आवश्यक आहे. सुपर-12 बद्दल बोलायचे झाले तर पावसामुळे 4 सामने होऊ शकले नाहीत. त्याचा फटका ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला सहन करावा लागला. दोन्ही संघांना उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan Skin Care: सारा अली खानची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नागपूरच्या बारमध्येच शासकीय काम; उपविभागीय अभियंत्याची चौकशी सुरू

भाषेवरून लोकसभेतच गदारोळ, निशिकांत दुबेंचा 'हिंदी' हट्ट, पाहा काय घडलं? |VIDEO

SCROLL FOR NEXT