सात सीनिअर खेळाडू टीम इंडियात असतील तर...; जडेजाने काढला रोहित शर्मावर राग

एका वर्षानंतरही भारतीय क्रिकेट संघाची स्थिती बदललेली नाही, कारण...
Rohit Sharma trolled
Rohit Sharma trolledsaam tv
Published On

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताचा सेमीफायनच्या सामन्यात 10 विकेट्स राखून दारूण पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियासह क्रिडा विश्वात भारतीय खेळाडूंना ट्रोल केलं जात आहे. बीसीसीआयनेही (BCCI) टीम इंडियाला धारेवर धरलं आहे. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू अजय जडेजाने या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मावर टीका केली आहे. (Ajay Jadeja criticises rohit sharma after losing in world cup 2022)

Rohit Sharma trolled
Team India: भारतीय संघात होणार मोठे बदल, रोहित शर्मा, विराट कोहली बाहेर जाणार? कारण...

रोहित शर्माला याआधी झालेल्या वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटची जबाबदारी दिली होती. एका वर्षानंतरही भारताची स्थिती बदललेली नाही. मागील वर्षीही भारताचा दहा विकेट्सने पराभव झाला आणि पहिल्या फेरीतच भारताचा पराभव झाला. यावर्षीही सेमीफायनलमध्ये भारताचा दारूण पराभव झाला. जडेजाने रोहितवर निशाणा साधून पराभवाचं कारण सांगितलं.

Rohit Sharma trolled
Rohit Sharma Captaincy : रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

रोहित शर्मा वयोवृद्ध, अजय जडेजा म्हणाला...

अजय जडेजा म्हणाला, मी एकच गोष्ट बोलतो जी रोहित शर्माला चटका देईल. जर एका कर्णधाराला एक टीम बनवायची असेल, तर त्याला संपूर्ण वर्ष टीमसोबत राहावं लागतं. वर्षभरात रोहित शर्मा किती दौऱ्यांना गेला आहे, याबाबत मी आधीही बोललो आहे. तु्म्हाला टीम बनवायची आहे आणि तुम्हीच सोबत राहत नाही. कोचही न्यूझीलंडला जात नाहीत. घरात एकच सीनिअर असला पाहिजे. सात जण वयोवृद्ध असतील तरीही अडचणी येणार, टी20 वर्ल्डकपआधी रोहित शर्माला काही दौऱ्यांमध्ये विश्रांती दिली होती. आता टीम इंडियाला न्यूझीलंडला जायचं आहे, तर रोहितला आणि द्रविडला विश्रांती देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com