pakistan twitter
Sports

PAK vs BAN: पावसानेही मजा घेतली! एकही सामना न जिंकता पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

Pakistan vs Bangladesh Highlights: पाकिस्तान आणि बागंलादेश यांच्यातील सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील नववा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये होणार होता. या सामन्यात दोन्ही संघांना मोठा धक्का बसला. कारण पावसामुळे हा सामना सुरू होऊच शकला नाही.

हे दोन्ही संघ गुरुवारी आमनेसामने येणार होते. मात्र पावसाने काही विश्रांती घेतलीच नाही. त्यामुळे शेवटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य बाब म्हणजे, पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांना या स्पर्धेत खातेही उघडता आलेले नाही. शेवटचा सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघ शून्य गुणांसह स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

पाकिस्तान आणि बांगलादेश बांगलादेश यांच्यातील नववा सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी २:३० वाजता सुरू होणार होता. मात्र जोरदार पाऊस पडत असल्याने नाणेफेक होऊ शकला नाही. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र यजमानपद असूनही पाकिस्तानला एकही सामना न जिंकता स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानला लज्जास्पद पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता.

२९ वर्षानंतर मिळालं यजमानपद..

पाकिस्तानला २९ वर्षानंतर आयसीसीची स्पर्धा होस्ट करण्याची संधी मिळाली होती. मात्र भारताने पाकिस्तानात येऊन खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले गेले. भारतीय संघाने दुबईत खेळत असूनही स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर पाकिस्तानचा संघ दोन्ही सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

भारत - न्यूझीलंडचा सेमीफायनलमध्ये प्रवेश

भारत - न्यूझीलंड हे दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये होते. या दोन्ही संघांनी सलग २ सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेश हे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, २४ कॅरेटचा भाव किती? वाचा लेटेस्ट दर

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Navya Nair : लोकप्रिय अभिनेत्रीला केसात गजरा माळणे पडलं महागात, भरावा लागला तब्बल 1 लाखाचा दंड

Canara Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Milk Price Hike : महागाईचा भडका! म्हशीचे दूध लिटरमागे १० रुपयांनी वाढले

SCROLL FOR NEXT