India Vs Pakistan : विषयच हार्ड! तिकडे दुबईत भारताने पाकिस्तानला लोळवले, इकडे महाराष्ट्रात तुफान जल्लोष, VIDEO

India Vs Pakistan News : दुबईत भारताने पाकिस्तानला लोळवले. भारताने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींमध्ये जल्लोष पाहायला मिळाला.
India Vs Pakistan match celebration
India Vs Pakistan Saam tv
Published On

चॅम्पियन ट्रॉफीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताच्या सलग दुसऱ्या विजयामुळे भारत सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता दुणावली आहे. तर सलग दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. भारताने ऐतिहासिक विजयानंतर महाराष्ट्रात क्रिकेटप्रेमींमध्ये विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.

भारताच्या विजयानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. भारताच्या विजयानंतर क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडत जल्लोष केला. नागपुरातील क्रिकेटप्रेमींनी धरमपेठ येथील लक्ष्मीभवन चौकात जल्लोष केला. नागपुरातील क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडून आतिषबाजी केली. कोल्हापुरातील क्रिकेट प्रेमींनी शिवाजी चौकात येऊन जल्लोष साजरा केला. तर पुणेकरांनी गुडलक चौकात भारताच्या विजयाचा आनंद साजरा केला.

अहिल्यानगरमध्ये विजयाचं सेलिब्रेशन

भारताच्या विजयानंतर अहिल्यानगरमध्ये क्रिकेटप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळाला. भारताने पाकिस्तानवर सहा विकेटने विजय मिळवल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. अहिल्यानगर शहरातील माळीवाडा येथील स्क्रीन लावून नागरिकांनी सामन्याचा आनंद घेतला.

India Vs Pakistan match celebration
IND vs PAK Toss Record: पाकिस्तानविरोधात टॉस हरला, रोहितच्या नावावर नकोसा विक्रम

ठाण्यात क्रिकेटप्रेमींकडून आनंद व्यक्त

भारताने आपला पारंपरिक स्पर्धक असलेल्या पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील युवकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. तसेच या क्रिकेटप्रेमींनी भारताला कप जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

India Vs Pakistan match celebration
Pakistan Players Fined: शहाणपणा नडला! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानच्या ३ खेळाडूंवर ICC ची मोठी कारवाई

भारताच्या विजयानंतर तरुणाईचा रस्त्यावर जल्लोष

भारताच्या विजयानंतर नाशिककर रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात नाशिककरांकडून गर्दी करत जल्लोष केला. 'भारत माता की जय' म्हणत नाशिककरांकडून रस्त्यावर उतरून जल्लोष केला आहे.

दरम्यान, भारताच्या विजयानंतर काश्मीरमधील क्रिकेटप्रेमींना आनंद व्यक्त केला. त्यांनी परिसरात फटाके फोडून आनंद साजरा केला. काश्मीरमधील क्रिकेटप्रेमींनी भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com