PAK vs AFG Saam Tv
Sports

PAK vs AFG | राडा ! पाकिस्तानच्या बॅटस्मननं अफगाण खेळाडूवर उगारली बॅट (Video)

आशिया चषक स्पर्धेतील काल पाकिस्तान आणि अफगाणिस्ताचा सामना झाला. या सामन्यात थ्रिल, अॅक्शन आणि ड्रामा हे सगळंच पाहायला मिळाले.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: आशिया चषक स्पर्धेतील काल पाकिस्तान आणि अफगाणिस्ताचा (Pakistan) सामना झाला. या सामन्यात थ्रिल, अॅक्शन आणि ड्रामा हे सगळंच पाहायला मिळाले. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 129 धावा केल्या, हे लक्ष पाकिस्तानच्या टीमने सहज गाठेल असं वाटत होते, पण, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी दोरदार कामगिरी करत शेवटच्या षटकापर्यंत झुंजवले. शेवटच्या षटकात पाकिस्तानचा पराभव होईल असे वाटत होते.

पाकिस्तानच्या 119 धावांत 9 बळी गेले होते. पण, नसीम शाहने 20 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकत पाकिस्तानला (Pakistan) 1 विकेटने रोमांचक विजय मिळवून दिला.

या सामन्यादरम्यान, पाकिस्तान (Pakistan) संघ फलंदाजी करत असताना मैदानावर अशी घटना घडली या घटनेमुळे सामन्यावर गोलबोट लागले. सामन्याच्या 19 व्या षटकात पाकिस्तानी फलंदाज आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद यांच्यात जोरदार भांडण झाले. फरीदला मारण्यासाठी आसिफ अलीने बॅटही उगारली, पण, अफगाणिस्तानचे खेळाडू आणि पंच घटनास्थळी आले, आणि भांडण थांबवल.

सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या (Pakistan) विकेट्स सातत्याने पडत होत्या. 18 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या 7 गडी गमावून 109 अशी होती. पाकिस्तानच्या सर्व आशा आसिफ अलीवर अवलंबून होत्या. त्याने 5 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 9 धावा केल्या. पाकिस्तानच्या डावातील 19 वे षटक टाकण्यासाठी फरीद अहमद आला. त्याने आपल्या दुसऱ्याच चेंडूवर हारिस रौफला बाद केले. यावेळी त्याला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे सामन्याचा संपूर्ण भार आसिफ अलीवर आला. त्याने एका चेंडूनंतर षटकार ठोकला. तो फरीदकडे गेला आणि पुढच्याच चेंडूवर अफगाणिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाने स्लो बाउन्सरवर असिफ अलीला झेलबाद केले.

आसिफची विकेट घेतल्यावर फरीद आनंद व्यक्त केला. यावेळी पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या आसिफला काहीतरी चिडवले. यामुळे आसिफला राग आला आणि त्याने फरीदला मारण्यासाठी बॅट उचलली. हे पाहून अंपायर आणि अफगाणिस्तानचे खेळाडू त्याच्या दिशेने धावले आणि त्याला थांबवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT