Asia Cup 2022, PAK vs AFG : आशिया चषक २०२२ स्पर्धेत टीम इंडियाचं (Team India) आव्हान संपुष्टात आलं आहे. कारण, आजच्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर थरारक विजय मिळवला आहे. अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) शेवटच्या षटकांत अफगाणिस्तानचा १ विकेट्सने पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश केलाय. (Asia Cup AFG vs PAK Match Live Updates)
आजचा सामना पाकिस्तान संघासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा होता. कारण, स्पर्धेत आव्हान टिकवायचे असेल तर पाकिस्तानला विजय मिळवणं गरजेचा होता. त्यामुळे पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने आज टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने पाकिस्तानला १३० धावांचे लक्ष ठेवलं होते. मात्र, अफगाणिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना पाकिस्ताने १९.२ षटकांत १ गडी राखून विजय मिळवला.
युवा गोलंदाज नसीम शाहने अखेरच्या षटकात दोन षटकार लगावत पाकिस्तानचा विजय ओढून आणला. तत्पुर्वी १३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात अतिशय खराब झाली. पहिल्याच षटकांत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम शून्यावर माघारी परतला. त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी संथ आणि बचावात्मक पवित्रा आजमावला. (Team India Asia Cup 2022)
फखर झमान सुरूवात मिळाली पण ५ धावांवर तो धावबाद झाला. त्यानंतर भारताविरूद्धच्या सामन्यातील हिरो मोहम्मद रिजवानला राशिद खानने २० धावांवर पायचीत बाद केले. त्यामुळे १० षटकांपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या ३ बाद ५२ इतकी होती.
अशाप्रकारे सुरूवातीच्या १० षटकांपर्यंत पाकिस्तानचा डाव संथ होता. नंतर पाकिस्तानच्या शादाब खान-इफ्तिखारने फटकेबाजी करत सामना फिरवला. या दोघांनी वेगवान फलंदाजी केली. पण शेवटच्या टप्प्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करत सामन्यात रंगत आणली. (Asia Cup Qualifiers 2022)
दरम्यान, अखेर शेवटच्या षटकांत पाकिस्तानला ११ धावांची आवश्यकता असताना, नसीम शाहने पहिल्या २ चेंडूत २ षटकार खेचत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने या विजयासह श्रीलंकेविरूद्ध ११ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तर अफगाणिस्तानच्या पराभवासोबत त्यांचे आणि भारताचेही आव्हान संपुष्टात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.