मुंबई: आयसीसीने (ICC) टी-२० क्रिकेट फलंदाजांची क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबर आझमची जागा भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव घेईल, अशी आशा होती. पण या दोघांच्यात 'तिसरा'चा लाभ झाला.
पाकिस्तानचा विकेटकीपर-फलंदाज मोहम्मद रिझवान आता टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. ओपनिंग पार्टनर बाबर आझमलाच त्यानं मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे. ताज्या क्रमवारीत भारताच्या सूर्यकुमार यादवचंही मोठं नुकसान झालं आहे.
सूर्यकुमार यादवने आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2022) हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात तुफानी खेळी केली होती. तसेच याआधीच्या टी-२० (T 20 Cricket) मालिकेतही त्याने तडाखेबंद फलंदाजी केली होती. टी-२० रँकिंगमध्ये सूर्यकुमार हा आझमला मागे टाकून अव्वल स्थान मिळवेल, अशी अपेक्षा होती. पण बाबर आझम आणि सूर्यकुमार हे दोघेही फार कमाल करू शकले नाहीत. दुसरीकडे रिझवानची बॅट तळपत आहे. त्यामुळे आयसीसीच्या ताज्या टी २० आकडेवारीत रिझवान अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
बाबर आणि सूर्यकुमारच यादव या दोघांना ताज्या क्रमवारीत एकेका स्थानाचे नुकसान सोसावे लागले आहे. बाबर आझम हा दुसऱ्या स्थानी, सूर्यकुमार यादव हा टॉप ३ मधून बाहेर पडला आहे. आता तो चौथ्या स्थानी फेकला गेला आहे. तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम आहे.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत टॉप ५ मध्ये पाकिस्तानचे दोन फलंदाज आहेत. तर भारत आणि इंग्लंडसह दक्षिण आफ्रिकेचा प्रत्येकी एक फलंदाज आहे. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवुड पहिल्या स्थानी आहे. तर टॉप १० मध्ये भारताचा एकही गोलंदाज नाही. अष्टपैलूंच्या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आहे. भारताचा हार्दिक पंड्या पाचव्या स्थानी आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.