yashasvi jaiswal twitter
Sports

IND vs AUS 5th Test: ओय कॉन्टास, शॉट नाही लागत का?; जयस्वालचा हिंदी तडका, मैदानातच स्लेजिंगचा भडका, VIDEO

Yashasvi Jaiswal To Sam Kontas Viral Video: सिडनी कसोटीतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना, यशस्वी जयस्वाल सॅम कॉन्टासला चिडवताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघाचा डाव १८२ धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला १८१ धावा करता आल्या.

फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर गोलंदाजांनी आपला रोल व्यवस्थितरित्या पार पाडला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर संपवला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जयस्वाल सॅम कॉन्टासची फिरकी घेताना दिसला.

जयस्वालने घेतली कॉन्टासची फिरकी

सिडनी कसोटीतील दुसऱ्या दिवशी सॅम कॉन्टास फलंदाजी करत होता. त्यावेळी जयस्वाल कॉन्टासची फिरकी घेताना दिसून आला. भारतीय फलंदाज ज्यावेळी फलंदाजी करत होते, त्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू फलंदाजांचं लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी बोलताना दिसून येत होते.

ज्यावेळी कॉन्टास फलंदाजीला आला, तेव्हा जयस्वालने चांगलाच बदला घेतला. कॉन्टस फलंदाजी करताना जयस्वाल त्याला, ' ओए कोन्स्टस क्या हो गया अब शॉट दिखाई नहीं दे रहा क्या?...' असं म्हणाला. जयस्वालचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेटकरीही या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत. समालोचन करत असलेल्या इरफान पठाणलाही हसू आवरलं नाही.

ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ वर आटोपला

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाला १८५ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ वर आटोपला. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा कहर पाहायला मिळाला.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना वेबस्टरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले आहे. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजी करताना प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि नितीश कुमार रेड्डीने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज फ्लॉप

या सामन्यातील पहिल्या डावात भारताचा डाव १८५ वर आटोपला होता. दुसऱ्या डावातही भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. एकट्या रिषभ पंतने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाचा डाव १०० पार पोहोचवला. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालला २२, केएल राहुलला १३,शुभमन गिलला १३, विराट कोहलीला ६ आणि नितीश कुमार रेड्डीला अवघ्या ४ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT