
सिडनी कसोटी सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. भारतीय संघाला मालिका बरोबरीत आणण्याच्या दृष्टीने आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे अतिशय महत्वाचे आहे.
मात्र सामन्यातील पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी निराश केले. भारताचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांवर आटोपला. या धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी चांगलाच जोर लावला आणि ऑस्ट्रेलियाला १८१ वर ऑल आऊट केलं
दुसऱ्या दिवशी काय घडलं? (Ind vs aus 5th test day 2 highlights)
पहिल्या दिवसाच्या शेवटचे काही षटक शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आली. बुमराहने शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियाचे ९ फलंदाज बाद करण्याची मोठी जबाबदारी होती.
ही जबाबदारी गोलंदाजांनी योग्यरीत्या पार पाडली. बुमराह, सिराज, कृष्णा आणि नितीशच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांवर आटोपला. इथून भारताला कमबॅक करण्याची संधी निर्माण झाली. कारण पहिल्या डावात कमी धावा करूनही भारताला ४ धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्याच दिवशी भारतीय संघाला दुसऱ्या डावात फलंदाजीला यावं लागलं. भारताच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकरून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. यशस्वी जयस्वालने वादळी सुरुवात करून दिली. मात्र तो फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. त्याने २२ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर केएल राहुलने १३ धावा केल्या. गिल आणि विराट या सामन्यातही स्वस्तात माघारी परतले. गिलने १३ तर विराटला ६ धावा करता आल्या.
भारतीय संघाला धावांची गरज होती, अशा परिस्थितीत रिषभ पंत मैदानावर आला. त्याने संधीचा फायदा घेत चौकार षटकार खेचले. झटपट धावा करून त्याला संघाला शंभरी गाठून दिली. या डावात त्याने ३३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांचा साहाय्याने ६१ धावांची खेळी केली. भारताने दुसऱ्या दिवसाखेर ६ गडी बाद १४१ धावा केल्या आहेत. भारताकडे १४५ धावांची आघाडी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.