oye bhai jyada hero nahi banne ka rohit sharma warns sarfaraz khan in live match video went viral twitter
Sports

IND vs ENG, Viral Video: 'ओय भाई.. जास्त हिरो बनायचं नाही...' लाईव्ह सामन्यात रोहितने सरफराजला झापलं; पाहा Video

Rohit Sharma- Sarfaraz Khan Viral Video: सामन्याच्या तिसऱ्या दिवसातील रोहित शर्मा आणि सरफराज खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG, Sarfaraz Khan- Rohit Sharma Viral Video:

रांची कसोटी जिंकण्यापासून भारतीय संघ अवघ्या काही धावा दूर आहे. भारतीय संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांचं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाखेर ४० धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा नाबाद २४ तर यशस्वी जयस्वाल नाबाद १६ धावा करत माघारी परतला आहे. दरम्यान सामन्याच्या तिसऱ्या दिवसातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हिरो बनायचं नाही...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ युवा भारतीय फलंदाज सरफराज खानचा आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मा सरफराज खानला चेतावणी देताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहित सरफराज खानला म्हणतोय की, 'ओय भाई.. जास्त हिरो बनायचं नाही...' रोहित नेमकं काय बोलला आणि का बोलला हे समालोचन करत असलेल्या दिनेश कार्तिकने समजावून सांगितलं. (Cricket news marathi)

आपला दुसराच सामना खेळत असलेला सरफराज खान हेल्मेट न घालताच शॉर्टला क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभा होता. त्यावेळी रोहितने त्याला बजावून सांगितलं की, हेल्मेट न घालता उभा राहू नकोस. रोहितचं स्पष्ट म्हणणं होतं की, सरफराजने रिस्क घेऊ नये. रोहित आणि सरफराजचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली पोलिसांनीही शेअर केला व्हिडिओ...

रोहित आणि सरफराजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दिल्ली पोलिसांनी देखील हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओला हटके कॅप्शन देखील दिलं आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहीले की, ' टू-व्हिलरवर हिरो बनायचं नाही. नेहमी हेल्मेट घालायचं...'

भारतीय संघाला विजयासाठी १९२ धावांची गरज...

रांची कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडने भारतीय संघासमोर १९२ धावांचं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी ४० धावा केल्या. तिसऱ्या दिवसाखेर रोहित शर्मा २४ तर यशस्वी जयस्वाल १६ धावा करत माघारी परतला. हा सामना जिंकून भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : पुष्पा म्हणतो झूकेगा नाही साला, गद्दार म्हणतो उठेगा नाही साला - ठाकरेंचा शिंदेंना टोला

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT