Early signs of heart disease saam tv
लाईफस्टाईल

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Heart disease genetic risk: हृदयविकाराचा (Heart Disease) धोका फक्त चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळेच वाढतो असे नाही, तर अनुवांशिक (Genetic) कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. एका धक्कादायक अभ्यासातून असे समोर आलंय.

Surabhi Jayashree Jagdish

दरवर्षी जगभरात कार्डिओव्‍हॅस्‍कुलर डिसीजमुळे जवळपास १८ दशलक्ष व्‍यक्‍तींचा मृत्‍यू होतो. तर भारतात याचं प्रमाण एक-पंचमांश आहे, जे सर्व कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्‍यूंपेक्षा जास्‍त आहे. तरीही यासाठी कारणीभूत असलेल्‍या अनुवांशिक जोखीम घटकाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जातं. अंदाज आहे की भारतातील जवळपास २५ टक्‍के व्‍यक्‍तींना एलीव्‍हेटेड लिपोप्रोटीन(ए) किंवा एलपी (ए) आहे, पण क्‍वचित चाचणी केली जाते आणि हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याच्‍या धोरणांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं.

जागतिक हृदय दिनापूर्वी ग्‍लोबल हार्ट हब आणि नोवार्टिस यांनी 'इन्ट्रोड्युसिंग द लिटर (ए) विथ बिग कॉन्‍सीक्‍वेन्‍सेस्'साठी आंतरराष्‍ट्रीय आरोग्‍यसेवा तज्ञांना आमंत्रित केलं. ज्यामध्ये महत्त्वपूर्ण, निदान न होणारी अंतर्गत स्थिती म्‍हणून एलीव्‍हेटेड एलपी(ए)ला प्रकाशझोतात आणण्‍यात आलं. या स्थितीमुळे हार्ट अॅटॅक किंवा स्‍ट्रोक यांसारख्‍या कार्डिओव्‍हॅस्‍कुलर डिसीजचा धोका वाढतो.

नोवार्टिसच्या नव्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आशिया पॅसिफिक आणि मध्य पूर्वेतल्या तीनपैकी दोन म्हणजेच तब्बल ६६ टक्के लोक नियमित हृदय चाचणी करत नाहीत. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे जवळपास निम्मे (४५%) लोकांना अनुवंशिकता हृदयविकारासाठी धोकादायक घटक असतं हेही माहीत नाही. याशिवाय एलपी(ए) या महत्त्वाच्या बायोमार्करबाबत जागरूकता अत्यंत कमी आहे. फक्त २२% लोकांनीच याबाबत ऐकलं असून केवळ ७% लोकांनी प्रत्यक्ष ही चाचणी करून घेतली आहे.

अपोलो हॉस्पिटल्स, भारताचे कार्डिओलॉजी संचालक डॉ. ए. श्रीनिवास कुमार याबाबत म्हणाले, "हृदयविकार हा भारतात मृत्यूचे प्रमुख कारण आहे. एलपी(ए) वाढलेलं असणं हे एक मोठे जोखमीचे कारण आहे. विशेषतः दक्षिण आशियाई देश अधिक असुरक्षित आहेत. भारतात ३४% अॅक्युट कोरोनरी सिंड्रोम रुग्णांमध्ये एलपी(ए) पातळी जास्त असल्याचं दिसतं. यासोबत मधुमेह, लठ्ठपणा किंवा उच्च रक्तदाब असल्यास हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्याचा धोका आणखी वाढतो. त्यामुळे एलपी(ए)ची तपासणी करणे अत्यावश्यक आहे, ज्यामुळे जोखीम असलेल्या रुग्णांची वेळेत ओळख होऊन त्यांना वाचवता येऊ शकते."

हार्ट हेल्थ इंडिया फाउंडेशनचे संस्थापक राम खंडेलवाल म्हणाले, "भारतातील अनेकांना हे माहीतच नाही की, साध्या रक्त तपासणीतूनही एलपी(ए)ची पातळी तपासता येते आणि त्यातून अनुवंशिक धोक्याचं निदान होतं. मोठी हृदयविकाराची घटना घडल्यानंतरच लोक चाचणी करण्याचा विचार करतात, हे धोकादायक आहे. जागरूकता वाढवणं आणि लोकांना माहितीपूर्ण बनवणं हीच काळाची गरज आहे."

नोवार्टिस इंडियाचे देशप्रमुख व व्यवस्थापकीय संचालक अमिताभ दुबे यांनी सांगितले, "एलपी(ए) तपासणी करणं हे हृदयविकार टाळण्यासाठी आणि लाखो लोकांचे जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नोवार्टिस गेली तीन दशके संशोधन आणि उपचार क्षेत्रात काम करत आहे आणि आम्ही रुग्णांना मोठ्या प्रमाणावर थेरपी उपलब्ध करून देतो, ज्यामुळे लोक सक्रिय पद्धतीने हृदयाचं रक्षण करू शकतात."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Ankita Walawalkar: मराठी लोकांनी अन् गावखेड्यातल्या प्रत्येकाने...; महाराष्ट्र भाऊ प्रणित मोरेला अंकिता वालावलकरचा पाठिंबा

Myra Vaikul Dance: लाल साडी अन् कपाळी मळवट, नवरात्रीनिमित्त छोट्या मायराचा 'लल्लाटी भंडार...' गाण्यावर स्पेशल डान्स, VIDEO

Central Railway: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सीवूड्स-उरण मार्गावर २० अतिरिक्त लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT