Premature menopause: चाळीशी गाठण्याआधीच महिलांच्या शरीरात अनपेक्षित बदलाने वाढवली चिंता; अकाली रजोनिवृत्तीच्या समस्येत वाढ

Menstruation stopping before 40: मासिक पाळी (Menstruation) थांबणे हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा असतो, जो साधारणपणे ४५ ते ५५ वयोगटात येतो. पण, गेल्या काही वर्षांपासून महिलांमध्ये चाळीशीपूर्वीच मासिक पाळी थांबण्याची (Menstruation Before 40) समस्या वाढली आहे.
Menstruation stopping before 40
Menstruation stopping before 40saam tv
Published On
Summary
  • चाळीशीपूर्वीच रजोनिवृत्ती येणं म्हणजे अकाली रजोनिवृत्ती होय.

  • जीवनशैलीतील बदल अकाली रजोनिवृत्तीची मुख्य कारणे आहेत.

  • धूम्रपान, तणाव आणि केमोथेरपी धोका वाढवतात.

महिलांना एक ठराविक वेळी रजोनिवृत्ती येते. मात्र आजकाल चाळीशीतच रजोनिवृत्ती येत असल्याचं दिसून येतंय. याला अकाली रजोनिवृत्ती म्हणतात. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, वयाच्या ४० वर्षापूर्वी स्त्रीच्या अंडाशयाचं कार्य थांबते तेव्हा त्याला अकाली रजोनिवृत्ती, प्रीमेच्योर ओव्हेरियन फेल्युअर किंवा प्रीमेच्योर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असं म्हणतात.

काय आहेत यामागे कारणं?

वाढता ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यासारखे जीवनशैलीसंबंधीत घटक याच मोठी भूमिका बजावत आहेत. वेळीच लक्षणं ओळखणं आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन महिलांना त्यांच्या प्रजनन आरोग्याचं रक्षण करण्यास मदत करू शकते.

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमरजा परांजपे यांनी सांगितलं की, अकाली रजोनिवृत्ती, ज्याला प्रीमेच्योर ओव्हेरियन फेल्युअर किंवा प्रीमेच्योर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असं म्हणतात, हे तेव्हा होते ज्यावेळी अंडाशय रजोनिवृत्तीच्या नैसर्गिक वयापेक्षा खूप लवकर स्त्रीबीज आणि हार्मोन्स तयार करणं थांबवतं. रजोनिवृत्तीचे सरासरी वय सुमारे ४५ ते ५० वर्षे असले तरी, काही महिलांमध्ये ते खूप लवकर सुरू होते, कधीकधी त्यांच्या ३० च्या सुरुवातीच्या काळातही यास सुरुवात होऊ शकते.

जीवनशैलीतील बदल, अनुवंशिकता, स्वयंप्रतिकार रोग, केमोथेरपी सारख्या काही वैद्यकीय उपचार आणि गंभीर संसर्ग देखील लवकर रजोनिवृत्तीला कारणीभूत ठरू शकतात. सामान्य लक्षणांमध्ये अनियमित किंवा चुकलेली मासिक पाळी, रात्री घाम येणे, मूड स्विंग्ज, योनीमार्गाचा कोरडेपणा आणि प्रजनन क्षमता कमी होणे यांचा समावेश आहे.

Menstruation stopping before 40
Liver cancer early symptoms: लिव्हरचा कॅन्सर सुरू होण्यापूर्वी शरीरात दिसतात मोठे ७ बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

डॉ. परांजपे पुढे म्हणाल्या की, गेल्या २-३ महिन्यांत, मला भेटणाऱ्या १० पैकी २ महिलांना अकाली रजोनिवृत्तीचा सामना करावा लागला आहे. अनेक महिला या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना तात्पुरते शारीरीक बदल समजतात. ज्या महिला अकाली रजोनिवृत्तीचा सामना करतात त्यांना वंध्यत्व, ऑस्टियोपोरोसिस, हृदयरोग आणि नैराश्याचा धोका अधिक असतो. तरुण वयात इस्ट्रोजेनचे नुकसान हे हाडांच्या ताकदीवर, हृदयाच्या आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावरही दीर्घकालीन परिणाम करते.

Menstruation stopping before 40
Heart blockage: हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; सामान्य समजून लोकं करतात इग्नोर

तज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करणं गरजेचं आहे. जोखीम कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणावाचं मॅनेजमेंट तसंच निरोगी जीवनशैली बाळगणं गरजेचं आहे. अनियमित मासिक पाळीच्या समस्येबाबत स्त्रीरोग तपासणी आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. काही प्रकरणांमध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्याचे पर्याय महिलांना या स्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात, असंही डॉ. परांजपे यांनी सांगितलं आहे.

Menstruation stopping before 40
Memory Booster Tips : तुम्हाला गोष्टी लक्षात राहत नाहीत का? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय

झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका सोनवणे म्हणाल्या की, आमच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या बहुतांश महिलांमध्ये तिशी उलटल्यानंतर आणि चाळीशीच्या सुरुवातीलाच अकाली अंडाशय निकामी होत असल्याची समस्या आढळून येते, ज्यामुळे अकाली रजोनिवृत्तीची समस्या उद्भवते. गेल्या २ ते ३ महिन्यांत, ओपीडीमध्ये दाखल झालेल्या दहा पैकी एका महिलेला अकाली रजोनिवृत्ती झाल्याचे आढळून आले. हे केवळ महिलांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करत नाही तर हाडे कमकुवत करते, हृदयरोग आणि भावनिक आरोग्य समस्यांचा धोका देखील वाढवते.

Menstruation stopping before 40
Smart brain exercises: स्मार्ट ब्रेनसाठी 3 खास एक्सरसाईज; स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्याचा वैज्ञानिक फॉर्म्युला

अकाली रजोनिवृत्ती ही अनुवंशिकता, दीर्घकालीन ताण, धूम्रपान, मद्यपान, पुरक आहाराची कमतरता आणि स्वयंप्रतिकार स्थितींमुळे होऊ शकते. महिलांना यामुळे अनियमित किंवा चुकलेली मासिक पाळी, रात्री घाम येणे, मूड स्विंग, योनीमार्गाचा कोरडेपणा आणि गर्भधारणेमध्ये अडचण येऊ शकते. अशावेळी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. प्रत्येक महिलेने तिच्या प्रजनन आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असं डॉ. प्रियंका यांनी सांगितलंय.

Menstruation stopping before 40
Brain improvement exercises: फोकस आणि स्मरणशक्ती वाढवायचीये? डॉक्टरांनी सांगितले मेंदूचे 3 सोपे व्यायाम, आजपासूनच करून पाहा
Q

अकाली रजोनिवृत्ती म्हणजे काय?

A

४० वर्षांपूर्वी अंडाशयाचे कार्य थांबणे.

Q

अकाली रजोनिवृत्तीची प्रमुख कारणे कोणती?

A

ताण, धूम्रपान, व्यायामाचा अभाव आणि आहाराची चुकीची सवय.

Q

अकाली रजोनिवृत्तीची सामान्य लक्षणे कोणती?

A

अनियमित मासिक पाळी, रात्री घाम येणे, मूड स्विंग.

Q

अकाली रजोनिवृत्तीमुळे कोणता आरोग्य धोका वाढतो?

A

वंध्यत्व, हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस आणि नैराश्य.

Q

अकाली रजोनिवृत्तीच्या व्यवस्थापनासाठी काय गरजेचे आहे?

A

वेळेवर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला आणि हार्मोन थेरपी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com