kane williamson with virat kohli  twitter
Sports

NZ vs SA Test : विराटचा मोठा रेकॉर्ड मोडला! याबाबतीत केन विलियम्सनने डॉन ब्रॅडमनलाही सोडलं मागे

Kane Williamson Record: न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या कसोटीत केन विलियम्सनने विराट कोहली आणि डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Kane Williamson Record News:

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. ओव्हलच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात केन विलियम्सनने शतक झळकावलं आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर केन विलियम्सनने नाबाद ११२ धावा केल्या आहेत. दरम्यान या शतकी खेळीसह त्याने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

केन विलियम्सनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावलेलं हे शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३० वे शतक ठरले आहे. तर विराट कोहलीच्या नावे २९ शतकांची नोंद आहे. तर डॉन ब्रॅडमन यांनी देखील २९ शतकं झळकावली होती. या दोन्ही दिग्गजांना मागे सोडत त्याने शिवनारायण चंद्रपॉल, जो रूट आणि मॅथ्यू हेडनच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

या रेकॉर्डमध्ये रिकी पाँटिंगला सोडलं मागे..

केन विलियम्सनच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो सर्वात कमी डावात ३० शतकं झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने रिकी पाँटिंगला मागे सोडलं आहे. रिकी पाँटिंगने आपलं ३० वं शतक १७० व्या डावात झळकावलं होतं. तर केन विलियम्सनने हे शतक १६९ व्या डावात झळकावलं आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने आपलं ३० वं शतक १५९ व्या डावात झळकावलं होतं. (Cricket news in marathi)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत न्यूझीलंडने २ गडी बाद २५८ धावा केल्या आहेत. रचिन रविंद्र ११८ तर विलियम्सन ११२ धावांवर नाबाद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT