नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचा धूम-धडाका सुरु झाला आहे. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सामना होत आहे. दोन्ही संघ कराचीमधील नॅशनल स्टेडियममध्ये आमनेसामने आले आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी वादळी खेळी खेळली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी खेळत पाकिस्तानला विजयासाठी ३२१ धावांचं आव्हान दिलं.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिजवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी खेळत पाकिस्तानसमोर विजयाचं भलं मोठं आव्हान ठेवलं. न्यूझीलंडने ५० षटकात ३२० धावा कुटल्या. विल यंग आणि टॉम लॅथमने शतकी खेळी खेळली. गेन फिलिफ्सने ३९ चेंडूत ६१ धावा कुटल्या. डेवोन कॉनवे आणि डेरिल मिचलने प्रत्येकी १०-१० धावा कुटल्या. केन विलियमसन्सने फक्त एकच धाव केली. पाकिस्तानचा नसीम शाह, हारिस राऊफने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतले. तर अबरार अहमदने एक विकेट घेतला.
न्यूझीलंडसाठी टॉम लॅथमने नाबाद ११८ धावा कुटल्या. टॉमने ९५ चेंडूत शतकी खेळी खेळली. टॉमने आठवं शतक पूर्ण केलं. ५० व्या षटकात हारिसने फिलिप्सचा बळी घेतला. त्याने ३९ चेंडूत ६१ धावा कुटल्या. त्याने तीन षटकार आणि ४ चौकार लगावले. फिलिफ्सने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्सने संघासाठी शतकी भागिदारी रचली. दोघांनी केलेली शतकी भागिदारी न्यूझीलंडला फायदेशीर ठरू शकते. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळी खेळली. ग्लेन फिलिप्सने शाहीन शाह अफ्रीदीला सलग दोन षटकार लगावले. अफ्रीदीसाठी आज खास दिवस राहिला नाही. अफ्रीदीने एका षटकात १८ धावा केल्या. शेवटच्या षटकात हारिस रउफने ग्लेन फिलिप्सला ६१ धावांवर बाद केलं. न्यूझीलंडने ५० षटकात ३२० धावांचं भलं मोठं आव्हान दिलंय. न्यूझीलंडच्या धावांच्या आव्हानाला पाकिस्तान कसा सामोरे जातो, हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.