Cricketer Retirement: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Dimuth Karunaratne Announced Retirment From International Cricket: श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि फलंदाज करुणारत्नेने निवृत्तीची घोषणा केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
dimuth karunaratnesaam tv
Published On

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज दिमुथ करुणारत्ने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. १०० वा सामना प्रत्येक खेळाडूसाठी अतिशय खास असतो.

कारण खूप कमी असे खेळाडू आहेत, ज्यांना १०० कसोटी सामन्यांचा पल्ला गाठता येतो. दरम्यान १०० वा सामना खेळताच दिमुथ करुणारत्ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
IND vs ENG ODI Series Schedule: टी-२० नंतर आता वनडेचा थरार रंगणार! केव्हा, कधी अन् कुठे रंगणार सामने? पाहा वेळापत्रक

अचानक निवृत्तीचा निर्णय घेण्यामागचं कारण काय?

दिमुथ करुणारत्नेने आतापर्यंत ९९ कसोटी सामने खेळले आहेत. पुढील कसोटी सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. मात्र हा सामना त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरेल.

टॉप ऑर्डरमध्ये केलेल्या फ्लॉप शो मुळे त्याने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १४ महिन्यांपासून त्याची बॅट शांतच आहे. २०२४ वर्षात त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. त्याची गेल्या वर्षातील कामगिरी पाहिली, तर त्याने २०२४ मध्ये २७.०५ च्या सरासरीने १८२ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला अर्धशतकी खेळी करता आली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
IND vs ENG Records: भारताने कॅनडाला मागे सोडत जपानची केली बरोबरी! हा रेकॉर्ड तुम्हाला माहितच नसेल

दिमुथ करुणारत्ने काय म्हणाला?

निवृत्तीच्या निर्णयाबाबत बोलताना दिमुथ करुणारत्ने म्हणाला,' एक कसोटीपटू म्हणून एका वर्षात ४ कसोटी सामने खेळून फॉर्म टीकवून ठेवणं कठीण आहे. WTC सुरु झाल्यानंतर गेल्या २-३ वर्षात आमच्याकडे खूप कमी मालिका खेळल्या जात आहेत. माझा सध्याचा फॉर्म हे एक आहे. १०० कसोटी सामने पूर्ण आणि WTC साखळीचा शेवट, मला तरी वाटतं की निवृत्ती घेण्याची ही योग्यवेळ आहे.

दिग्गज खेळाडूंच्या यादीत मिळवणार स्थान

दिमुथ करुणारत्ने हा कसोटी क्रिकेटमध्ये १०० सामन्यांचा पल्ला गाठणारा श्रीलंकेचा सातवा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी सनथ जयसूर्या (११०), मुथैय्या मुरलीधरन (१३२) चामिंडा वास (१११), कुमार संगकारा (१३४) आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी १०० सामने खेळण्याचा कारनामा केला आहे. मुख्य बाब म्हणजे दिमुथ करुणारत्नेने २०१२ मध्ये ज्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना पदार्पण केलं होतं त्याच मैदानावर तो आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com