tim southee twitter
Sports

NZ vs ENG: शेवटच्या सामन्यात साऊदीने इतिहास रचला! सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत ख्रिस गेलची केली बरोबरी

Tim Southee Equals ChriS Gayle Record: न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज टीम साऊदीने सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेलच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Ankush Dhavre

न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेला तिसरा कसोटी सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. दरम्यान शेवटच्या कसोटीत त्याने षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.

आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या साऊदीने यावेळी गोलंदाजीत नव्हे, तर फलंदाजीत मोठा कारनामा करुन दाखवला आहे. वेस्टइंडीजचा माजी फलंदाज ख्रिस गेल मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. आता साऊदीने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेलच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

इंग्लंडविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात आलेल्या साऊदीने फलंदाजीत चांगलाच जोर लावला. त्याने १० चेंडूंचा सामना केला, यादरम्यान त्याने १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २३ धावांची वादळी खेळी केली.

या ३ षटकारांच्या मदतीने त्याने सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या रेकॉर्डमध्ये गेलची बरोबरी केली आहे. गेलने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना १०३ कसोटी सामन्यांमध्ये ९८ षटकार मारले होते. तर साऊदीने हा कारनामा १०७ सामन्यांमध्ये करुन दाखवला आहे.

न्यूझीलंडचा संघ आणखी एका इनिंगमध्ये फलंदाजीसाठी येणार आहे. या इनिंगमध्ये साऊदीला षटकारांचं शतक पूर्ण करण्याची संधी असणार आहे. पुढील इनिंगमध्ये २ षटकार मारताच तो षटकारांचं शतक पूर्ण करु शकतो.

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना केवळ ३ असे फलंदाज आहेत, ज्यांना १०० षटकारांचा पल्ला गाठता आला आहे. ज्यात बेन स्टोक्स, अॅडम गिलख्रिस्ट आणि ब्रेंडन मॅक्क्यूलमसारख्या फलंदाजांचा समावेश आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

बेन स्टोक्स- १३३

ब्रेंडन मॅक्क्यूलम- १०७

अॅडम गिलख्रिस्ट- १००

टीम साउदी- ९८

ख्रिस गेल- ९८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT