ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या न्यूझीलंड (New zealand vs Australia) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात केन विलियमन्सनला मोठी खेळी करता आलेली नाही. या डावात त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं आहे. दरम्यान रनआऊट होताच त्याच्या नावे आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
केन विलियमन्सन (Kane Williamson) हा आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी असलेला केन विलियमन्सने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे रेकॉर्ड केले आहेत. मात्र आपल्या १२ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत तो यापूर्वी कधीही रनआऊट झाला नव्हता. त्याच्या रनआऊटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Cricket news marathi)
तर झाले असे की, न्यूझीलंडची फलंदाजी सुरु असताना ऑस्ट्रेलियाकडून ५ वे षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर केन विलियमन्सनने समोरच्या दिशेने शॉट मारला आणि १ धाव घेण्यासाठी धाव घेतली. नेमकं त्याच वेळी नॉन स्ट्राइकला फलंदाजी करत असलेल्या विल यंगसोबत त्याची धडक झाली. या संधीचा फायदा घेत लाबुशेनने डायरेक्ट हिट करत त्याला माघारी धाडलं. गेल्या १२ वर्षांपासून न्यूझीलंड संघाचं प्रतिनिधित्व करत असलेला केन विलियमन्सन कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच रनआऊट झाला आहे. (Kane Williamson Run Out)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिायाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना कॅमेरुन ग्रीनने सर्वाधिक १७४ धावांची खेळी केली. मिचेल मार्शने ४०, उस्मान ख्वाजाने ३३ आणि स्टीव्ह स्मिथने ३१ धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३८३ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या १७९ धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. तर मॅट हेनरीने ४२ धावा केल्या. तर यष्टीरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल ३३ धावा करत माघारी परतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.