ind vs pak  canva
क्रीडा

Champions Trophy 2025: मानलं पाहिजे राव! PCB ला अजूनही वाटतंय टीम इंडिया पाकिस्तानात येणार

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. येत्या फेब्रुवारी- मार्च महिन्यात या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. भारतीय संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डने भारताच्या सहभाग घेण्याबद्दल कुठलीही योजना आखलेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डला कित्येक वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भुषविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानातच व्हावी, यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुरेपूर प्रयत्न करणार. ही स्पर्धा पाकिस्तानात होणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात यावी, असं बीसीसीआयचं म्हणणं आहे. यापूर्वी आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यावर नकार दिल्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली. जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने बीसीसीआयची अट मान्य केली नाही, तर भारतीय संघ या स्पर्धेतून माघार घेऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे.

एकीकडे बीसीसीआयला हायब्रिड मॉडेल हवं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला विश्वास आहे की, भारतीय संघ पाकिस्तानात येण्यासाठी होकार देईल. भारतीय संघाचे सामने दुसऱ्या ठिकाणी खेळवण्यात यावे, यासाठी आयसीसीने बजेट मंजूर केला आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डने याकडे दुर्लक्ष केलं आहे. पाकिस्तानला अजूनही हेच वाटतंय की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येणार. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या संभावित वेळापत्रकानुसार, भारतीय संघाचे सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र जर ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली,तर हे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळवले जाऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT