jasprit bumrah twitter
Sports

जसप्रीत बुमराहचं नाव नाही, विश्वचषकातील सर्वोत्तम ८ खेळाडूंची नावं जाहीर, वाचा ICC च्या यादीत कोण कोण?

टी२० विश्वचषकाच्या फायनलपूर्वी आयसीसीने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी ८ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताकडून फक्त संजू सॅमसनला स्थान मिळाले असून जसप्रीत बुमराहचा समावेश नसल्याने चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Namdeo Kumbhar

T20 World Cup Player of the Tournament nominees : टी२० विश्वचषकाच्या फायनलआधी आयसीसीने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी ८ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकासाठी अंतिम लढत होण्याआधी आयसीसीने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटची निवड केली आहे. धक्कादायक म्हणजे, या यादीमध्ये भारताच्या मॅच विनिंग जसप्रीत बुमराहला संधी मिळालेली नाही. फायनलमध्ये पोहचणाऱ्या टीम इंडियातील फक्त एका खेळाडूलाच या संघात स्थान देण्यात आले आहे.

आयसीसीच्या प्लेअर ऑफ द टूर्नामेंटच्या या यादीत भारताच्या फक्त संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला आहे . संजूने विश्वचषकातील बाद फेरीतील सामन्यांमध्ये आपल्या शानदार फलंदाजी केली. भारतीय संघ फायनलला पोहचण्यात संजूचा सिंहाचा वाटा आहे. प्लेअर ऑफ द टूर्नामेंटमध्ये आयसीसीने कोण कोणत्या खेळाडूंना संधी दिली पाहूयात...

विल जॅक्स (इंग्लंड) :

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्सने स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली. फलंदाजीने २२६ धावा केल्या आणि गोलंजीत ९ विकेट्स घेतल्या. टी२० विश्वचषकात सहाव्या-सातव्या स्थानावर फलंदाजी करताना केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.जॅकचा स्ट्राईक रेट १७६.५६ होता. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हकच्या नावावर होता. मिसबाह याने पहिल्या टी-२० विश्वचषकात २१८ धावा केल्या होत्या. जॅकला चार वेळा सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले.

लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका) :

वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी हा या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज राहिलाय. त्याने सात सामन्यांमध्ये १२ बळी घेतले आहेत. त्याची सरासरी १५.५८ आणि इकॉनॉमी रेट ७.१९ होता. संपूर्ण स्पर्धेत एनगिडींच्या स्लो चेंडूंमुळे फलंदाजांना त्रास झाला. भारताविरुद्ध त्याने चार षटकांत फक्त १५ धावा दिल्या.

एडेन मार्कराम (दक्षिण आफ्रिका) :

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करामनेही शानदार कामगिरी केली. त्याने आठ डावांमध्ये २८६ धावा केल्या. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ८६ धावांची खेळी केली. मार्करामची सरासरी ४७.६६ आणि स्ट्राईक रेट १६५.३१ आहे.

रचिन रवींद्र (न्यूझीलंड) :

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत आहेत. फलंदाजी करताना रवींद्रने १२८ धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धचा पहिला सुपर एट सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर, डावखुरा फिरकी गोलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली. त्याने ३२ धावा केल्या आणि २७ धावांत ४ बळी घेतले

व्हॅन शाल्कविक (यूएसए) :

३७ वर्षीय अमेरिकन वेगवान गोलंदाज शॅडली व्हॅन शाल्कविक हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून समोर आलाय. अमेरिका साखळी फेरीतूनच बाहेर पडला. पण त्याने फक्त चार सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्यात. त्याची सरासरी ७.७६ आणि इकॉनॉमी रेट ६.८० आहे. भारत आणि पाकिस्तानविरुद्ध त्याने प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या.

टिम सेफर्ट (न्यूझीलंड) :

न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज टिम सेफर्टने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण धावा केल्या. त्याने सात डावांमध्ये ४५.६६ च्या सरासरीने आणि १६१.१७ च्या स्ट्राईक रेटने २७४ धावा केल्या. त्याने तीन अर्धशतके केली.

साहिबजादा फरहान (पाकिस्तान) :

सलामीवीर साहिबजादा फरहान या स्पर्धेत पाकिस्तानसाठी सर्वात मोठा सामना जिंकणारा फलंदाज ठरला. त्याने सात डावांमध्ये ७६.६० च्या सरासरीने आणि १६०.२५ च्या सरासरीने ३८३ धावा केल्या. फरहानने दोन शतकेही ठोकली आणि टी२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडला.

संजू सॅमसन (भारत) :

भारताच्या संजू सॅमसन प्लेईंग ११ मध्ये उशिरा संधी मिळाली. पण त्याच्या दमदार फंलदाजीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्याने नामिबियाविरुद्ध एक छोटी पण महत्त्वाची खेळी खेळली. त्यानंतर त्याने झिम्बाब्वेविरुद्ध उपयुक्त योगदान दिले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या व्हर्च्युअल क्वार्टरफायनलमध्ये त्याने नाबाद ९७ धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात सॅमसनने ८९ धावा केल्या. चार डावांमध्ये संजूने ७७.३३ च्या सरासरीने आणि २०१.७३ च्या स्ट्राईक रेटने २३२ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

निदा खानला आश्रय देणं भोवलं; एमआयएमच्या नेत्याच्या घर आणि ऑफिसवर चालणार बुलडोझर|VIDEO

SCROLL FOR NEXT