chris gayle twitter
क्रीडा

Nicholas Pooran Record: वेस्टइंडीजचा नवा सिक्सर किंग! पुरनने या रेकॉर्डमध्ये ख्रिस गेललाही मागे सोडलं

Ankush Dhavre

वेस्टइंडीजचा स्टार फलंदाज निकोलस पुरन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. पुरन मैदानात उतरला की, गोलंदाज थरथर कापायला लागतात. पुरनची फलंदाजी स्टाइल म्हणजे, धावायचं कमी आणि चोपायचं जास्त.

आयपीएल २०२४ स्पर्धेतही त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. ही कामगिरी त्याने कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतही सुरु आहे. २०२४ मध्ये त्याने षटकारांचा पाऊस पाडला आहे. यासह त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये वेस्टइंडीजचा माजी फलंदाज ख्रिस गेलचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

मोडला हा मोठा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत धावांचा पाऊस पाडल्यानंतर निकोलस पुरन कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या स्पर्धेत तो त्रिनबागो नाईट रायडर्स संघाकडून खेळतोय.

त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात ९७ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ९ षटकार खेचले. यासह त्याने या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये १३९ षटकार पूर्ण केले आहेत.

ख्रिस गेलने २०१५ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये एकूण १३५ षटकार खेचले होते. निकोलस पूरनला हा आकडा आणखी वाढवण्याची संधी असणार आहे. तो कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा खेळणार आहे. तसेच हे वर्ष संपायला अजूनही ४ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे हा आकडा बराच वाढू शकतो.

टी-२० क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

निकोलस पुरन- १३९ षटकार, २०२४

ख्रिस गेल- १३५ षटकार, २०१५

ख्रिस गेल- १२१ षटकार, २०१२

ख्रिस गेल- ११६ षटकार, २०११

ख्रिस गेल- ११२ षटकार, २०१६

ख्रिस गेल- १०१ षटकार, २०१७

आंद्रे रसेल-१०१ षटकार, २०१९

ख्रिस गेल- १०० षटकार, २०१३

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर मी पाहिला, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

Manoj Jarange Patil: '...तर तुमचा राजकीय एन्काऊंटर', अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मनोज जरांगे संतापले; VIDEO

Nandurbar News : परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात १५०० हेक्टरवरील पिकांना फटका; मिरची, केळी, सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

Marathi News Live Updates : माजी मंत्री पद्माकर वळवी काँग्रेसच्या वाटेवर

Oh My God Movie: आधी ट्रोल झाला, मग ब्लॉकबस्टर ठरला; अक्षयच्या 'या' चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवला...

SCROLL FOR NEXT