Nicholas Pooran Record: वेस्टइंडीजमध्ये निकोलस पुरनने घातला राडा! लवकरच हिटमॅनलाही सोडणार मागे

Nicholas Pooran, Most Sixes In T20I Cricket: वेस्टइंडीजचा आक्रमक फलंदाज निकोलस पुरनने टी-२० क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे. लवकरच तो रोहित शर्माला मागे सोडू शकतो.
Nicholas Pooran Record: वेस्टइंडीजमध्ये निकोलस पुरनने घातला राडा! लवकरच हिटमॅनलाही सोडणार मागे
nicholas poorantwitter
Published On

दक्षिण आफ्रिकेचा संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये वेस्टइंडीजचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही वेस्टइंडीजने ३० धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पुरनच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Nicholas Pooran Record: वेस्टइंडीजमध्ये निकोलस पुरनने घातला राडा! लवकरच हिटमॅनलाही सोडणार मागे
Team India News: टीम इंडियात संधी मिळेना! शिखर धवननंतर हे ३ भारतीय खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती

पुरनच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

या सामन्यात निकोलस पुरनला फलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने १९ चेंडूंचा सामना करत १९ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १ षटकार मारला.

हा षटकार रेकॉर्ड ब्रेकिंग षटकार ठरला आहे. पुरनने मारलेला हा षटकार त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १४० वा षटकार ठरला आहे. हा कारनामा त्याने ८९ व्या इनिंगमध्ये करुन दाखवला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने सर्वात कमी इनिंगमध्ये १४० षटकार मारण्याचा पल्ला गाठला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टीन गप्टील दुसऱ्या स्थानी आहे.

रोहितने आतापर्यंत खेळलेल्या १५१ इनिंगमध्ये २०५ षटकार खेचले आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या मार्टीन गप्टीलने ११८ इनिंगमध्ये १७३ षटकार मारले आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या पुरनने ८९ इनिंगमध्ये १४० षटकार खेचले आहेत. यासह निकोलस पुरनने टॉप ३ मध्ये धडक दिली आहे.

Nicholas Pooran Record: वेस्टइंडीजमध्ये निकोलस पुरनने घातला राडा! लवकरच हिटमॅनलाही सोडणार मागे
Team India News: बांगलादेशची खैर नाय! शमी,बुमराहपेक्षाही खतरनाक गोलंदाज कमबॅकसाठी सज्ज

वेस्टइंडीजचा विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडीज संघाने २० षटकअखेर ६ गडी बाद १७९ धावा केल्या.दक्षिण आफ्रिकेला १८० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १४९ धावांवर आटोपला. हा सामना दक्षिण आफ्रिकेला ३० धावांनी गमवावा लागला आहे. यासह वेस्टइंडीजने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com