Chris gayle : 7 सामन्यात फक्त ७५ धावा, तरीही दमदार खेळेल; बड्या माजी खेळाडूने विराट कोहलीवर दाखवला मोठा विश्वास

Chris gayle on Virat Kohli : विराट कोहलीने ७ सामन्यात फक्त ७५ धावा कुटल्या आहेत. विराट कोहलीवर बड्या माजी खेळाडूने मोठा विश्वास दाखवला आहे.
7 सामन्यात फक्त ७५ धावा, तरीही दमदार खेळेल; बड्या माजी खेळाडूने विराट कोहलीवर दाखवला मोठा विश्वास
virat kohliyandex

नवी दिल्ली : टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेची लढत होणार आहे. या अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या खराब फॉर्मविषयी सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र, अनेक दिग्गज खेळाडूंनी विराट कोहलीवर विश्वास व्यक्त केला आहे. ख्रिस गेलनेही विराट कोहलीच्या फॉर्मवर मोठं वक्तव्य केलं.

अंतिम सामन्यापूर्वी गेलने मीडियाशी बोलताना मोठं भाष्य केलं. 'सुपरस्टार खेळाडू किंवा विराट सारख्या खेळाडूसोबत अशी घटना घडत असते. आम्हाला ठाऊक आहे की, विराटचा खेळ कसा होता. हे कोणासोबतही होऊ शकतं. महत्वाची बाब म्हणजे विराट कोहली अंतिम सामन्यात देखील खेळत आहे. बडे खेळाडू महत्वाच्या सामन्यात कमाल करू शकतात, असं ख्रिस गेलने सांगितलं.

7 सामन्यात फक्त ७५ धावा, तरीही दमदार खेळेल; बड्या माजी खेळाडूने विराट कोहलीवर दाखवला मोठा विश्वास
IND vs SA : अंतिम सामन्यात भारत की दक्षिण अफ्रिका जिंकणार? फायनलआधीच बड्या माजी खेळाडूने केली मोठी भविष्यवाणी

गेलने पुढे म्हटलं आहे की, विराटच्या खेळीमुळे सामना संघ जिंकू शकतो. त्यामुळे विराट कोहली सारख्या खेळाडूवर अविश्वास दाखवता येणार नाही. आम्हाला त्याचा खेळ माहीत आहे. तुम्ही थोडी वाट पाहा. अंतिम सामन्यात विराट काय करतो, हे पाहायला हवं'.

7 सामन्यात फक्त ७५ धावा, तरीही दमदार खेळेल; बड्या माजी खेळाडूने विराट कोहलीवर दाखवला मोठा विश्वास
T20 world Cup 2024 : फायनलपूर्वी राहुल द्रविड यांचं मोठं वक्तव्य, भारत-दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याचा प्लानच सांगितला

विराट कोहलीच्या खराब फॉर्मची सर्वत्र चर्चा होत आहे. विराट कोहलीने या स्पर्धेत आतापर्यंत ७ सामन्यात ७५ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेचा जलद गोलंदाज कॅगिसो रबाडाने ८ सामन्यात १२ गडी बाद केले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ६ पेक्षा कमी आहे. त्यामुळे विराट कोहलीला रबाडाच्या गोलंदाजीचा सामना करताना सावध व्हावं लागेल. रबाडाच्या १२ इनिंगपैकी विराट कोहली ४ वेळा बाद झाला आहे. त्यामुळे विराट कोहलीला रबाडाच्या गोलंदाजीवर सावधानतेने खेळावं लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com