ajaz patel 
Sports

फिरकीपटू एजाज पटेलला न्यूझीलंड संघातून वगळलं; लॅथम कर्णधार

न्यूझीलंड संघ आठ घरच्या कसोटी मालिकेत अपराजित राहिला आहे.

साम न्यूज नेटवर्क

वेलिंग्टन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका डावात सर्व गडी टिपणा-या फिरकीपटू एजाज पटेलला (ajaz patel) बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघातून वगळण्यात आले आहे. ३३ वर्षीय पटेलने मुंबईत भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संघास स्थान न देता राखीव ठेवण्यात आले आहे. new zealand spinner ajaz patel dropped for bangladesh series

दरम्यान (new zealand) प्रशिक्षक माईक स्टेड यांनी एका निवेदनात एजाजच्या भारतातील (india) रेकॉर्डब्रेक प्रदर्शनानंतर निश्चितच सर्वांना काैतुक आहे परंतु आम्ही नेहमीच नवाेदितांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन घडवावे यासाठी खेळाडू निवडण्याचे धोरण लागू केले आहे.बांगलादेश (bangladesh) विरुद्ध घरच्या मैदानावर निवडलेले खेळाडू सर्वोत्तम आहेत असा विश्वास ही स्टेड यांनी व्यक्त केला आहे.

अष्टपैलू रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल उत्तम फिरकी करु शकतात परंतु न्यूझीलंडचे मुख्य लक्ष वेगवान गोलंदाजांवर असल्याने टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर, काइल जेमिसन आणि मॅट हेन्री यांच्यावर भिस्त राहणार असेही स्टेड यांनी नमूद केले. दरम्यान केन विल्यमसनच्या जागी टॉम लॅथम प्रथमच संपूर्ण मालिकेसाठी संघाचे नेतृत्व करणार आहे. केनला अद्याप तंदुरुस्त नसल्याने ताे दोन्ही कसोटी सामन्यांना मुकणार आहे.

नवीन वर्षाच्या दिवशी बे ओव्हल येथे ही मालिका सुरू होईल. इंग्लंडमध्ये भारताचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर न्यूझीलंडची ही पहिली घरची कसोटी असेल. न्यूझीलंड संघ आठ घरच्या कसोटी मालिकेत अपराजित आहे. मार्च २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून १-० असा पराभव स्विकारावा लागला हाेता.

असा आहे न्यूझीलंडचा संघ

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रॉस टेलर, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, रचिन रवींद्र, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टिम साउथी, नील वॅगनर, ट्रेंट बोल्ट.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

SCROLL FOR NEXT