ढाका (dhaka) : अत्यंत चुरीशच्या झालेल्या सामन्यात भारतीय हाॅकीपटूंनी पाकिस्तान संघाचा ४-३ असा पराभव करीत आशियाई करंडक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत (Asian Champions Trophy Hockey 2021) कास्यपदक पटकाविले.
जपान आणि दक्षिण कोरियाने यांनी भारत आणि पाकिस्तानचा पराभव केल्याने दाेन्ही संघ पु्न्हा मैदानात तिस-या स्थानासाठी एकमेकांसमाेर उभे ठाकले. यापुर्वी भारताने (india) राउंड-रॉबिन गटात पाकिस्तानवर (pakistan) सहज विजय मिळविला हाेता. त्यामुळे आजचा (hockey) सामना देखील भारतीय संघ सहज जिंकेल अशी क्रीडाप्रेमींनी खात्री हाेती. परंतु ती फाेल ठरली. विजयासाठी भारतीय संघास अखेरच्या मिनीटापर्यंत झुंजावे लागले. india vs pakistan hockey news
हरमनप्रीत सिंगने आघाडीवर राहून त्याच्या बाजूने पहिला गोल संघासाठी नाेंदविला. त्याचा स्पर्धेतील आठवा गाेला होता. पाकिस्तानच्या अरफराजने उत्तम खेळ करीत भारतीय संघावर गाेल नाेंदवित खेळाच्या पहिल्या सत्रात १-१ असे बराेबरी साधली.
दुस-या सत्राच्या सुरुवातीला पाकिस्तानने भारताला धक्का दिला. अब्दुल राणाने सुरेख गोल करून २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय संघास जेरीस आणले. तिस-या सत्रात भारतीय संघातील सुमितने गोल करुन २-२ अशी बराेबरी साधली.
त्यानंतर वरुण कुमारने संघासाठी तिसरा आणि आकाशदीप सिंगने चाैथा गाेल नाेंदवि ४-२ अशी पाकिस्तान संघावर दाेन गुणांची आघाडी घेतली. सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना अहमद नदीमने पाकिस्तानसाठी एक गोल केला. परंतु त्याच्या परिश्रमाचे चीज झाले नाही. भारतीय संघाने (indian hockey team) हा सामना ४-३ असा जिंकला.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.