New Zealand VS Bangladesh Test Match AP/PTI
Sports

BAN vs NZ : इतिहासाची संधी हुकली! पहिली कसोटी मोठ्या फरकानं जिंकणाऱ्या बांगलादेशला न्यूझीलंडनं चारली धूळ

New Zealand VS Bangladesh : ढाका येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशला ४ गडी राखून पराभूत केलं. या विजयासह या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

Nandkumar Joshi

New Zealand beat Bangladesh 2nd Test :

ढाका येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशला ४ गडी राखून पराभूत केलं. या विजयासह या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. तर या पराभवासह बांगलादेशनं न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्याची सोनेरी संधी गमावली.

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात बांगलादेश संघाला अवघ्या १४४ धावाच करता आल्या. न्यूझीलंडला (New Zealand) विजयासाठी अवघ्या १३७ धावांचं लक्ष्य मिळालं. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सामन्याच्या चौथ्या दिवशीच ३८ षटकांत ६ गडी बाद १३८ धावा करून सामना जिंकून दिला.

फिरकी गोलंदाज एजाज पटेल याने ५७ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद केले. बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या १४४ धावांवर आटोपला. पहिला कसोटी सामना गमावणाऱ्या न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी १३७ धावा करायच्या होत्या. (Latest sports updates)

बांगलादेशच्या (Bangladesh) दुसऱ्या डावात जाकिर हसन यानं न्यूझीलंडच्या खोचक माऱ्याचा टिच्चून सामना केला. त्याने ८६ चेंडूंत ५९ धावांची झुंजार खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला.

बांगलादेशच्या डावाची सुरुवात २ बाद ३८ धावसंख्येवरून झाली. जाकिरने साउदीला एकाच षटकात दोन चौकार खेचून मनसुबे स्पष्ट केले. पण पटेलने मोमिनुल हकला १५ धावांवर बाद करून तिसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची झालेली भागीदारी संपुष्टात आणली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बांगलादेशने त्यानंतर अवघ्या ७३ धावांमध्ये ७ फलंदाज गमावले आणि न्यूझीलंडला मालिकेत बरोबरी साधण्याची आयती संधी दिली. सँटनरने मुशफिकुर रहीम याला ९ धावा आणि शहादत हुसैन याला अवघ्या ४ धावांवर बाद केले. त्यामुळे बांगलादेशचा अर्ध संघ फलकावर ८८ धावा असताना तंबूत परतला होता.

बांगलादेशने पहिल्या डावात १७२ धावा, तर न्यूझीलंडने १८० धावा केल्या होत्या. बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात १५० धावांनी विजय मिळवला होता. बांगलादेशकडे दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून कसोटी मालिका जिंकण्याची मोठी संधी होती. पण या पराभवाने ती ऐतिहासिक संधी गमावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विरोधकांचे दिवस संपले! राणा जगजितसिंह पाटील यांचा हल्लाबोल|VIDEO

Bihar Election : नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर संपली! भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणार का? महत्त्वाचं कारणं

Children Day 2025: या विकेंडला मुलांना घेऊन जा मुंबईतील 5 प्रसिद्ध ठिकाणी, मुलं होतील भरपूर खूश

Bihar Election Results: बिहारमध्ये काँग्रेस भुईसपाट का झाली? ही चार कारणे|VIDEO

Ensure Diabetes Care: डायबिटीज मॅनेजमेंटसाठी प्रगत उपाय! एन्‍शुअर डायबिटीज केअरमुळे होऊ शकतो मोठा फायदा

SCROLL FOR NEXT