CHAMPIONS TROPHY yandex
Sports

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर, कर्णधारपदाबाबत किवी बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Mitchell Santner : मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळेच त्याच्यावर विश्वास दाखवलाय.

Namdeo Kumbhar

New Zealand Announce Squad For Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. फिरकी अष्टपैलू मिचेल सँटनरच्या नेतृत्वातील १५ खेळाडूची निवड करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडचा संघ भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या गटात आहे. न्यूझीलंडची धुरा केन विल्यमसनऐवजी सँटरनच्या खांद्यावर सोपवण्यात आली.

मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळेच त्याच्यावर विश्वास दाखवलाय. आयसीसी स्पर्धेत मिचेल सँटर पहिल्यांदाच नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे संघ गट-अ मध्ये आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडने युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले कॉम्बिनेशन ठेवलेय. संघात विल्यम ओ'रोर्क, नॅथन स्मिथ आणि बेन सीयर्स यांना स्थान दिलेय. हे तिन्ही गोलंदाज पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेत खेळणार आहेत. बेन सियर्सबद्दल गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत राखीव खेळाडू होता. आता त्याला मुख्य संघात स्थान मिळालेय.

लॅथम यष्टीरक्षकाची भूमिकाही बजावेल. फलंदाजीत मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, केन विल्यमसन, यांचा पर्याय आहे. न्यूझीलंडचा संघ 19 फेब्रुवारी रोजी सामना खेळेल, तर 24 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना खेळेल. 2 मार्च रोजी न्यूझीलंड आणि भारताचा सामना होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघ :

मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य भारतीय संघ :

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, नितेश रेड्डी रविंद्र जडेजा, अक्षर पटेल/ वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव/ रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी, अर्शदीप सिंग

वेळापत्रक पाहा-

१९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची

२० फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

२१ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची

२२ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

२३ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

24 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

२५ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

२६ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

२७ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

२८ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

१ मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची

२ मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

४ मार्च – उपांत्य फेरी १, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई*

५ मार्च – उपांत्य फेरी २, गद्दाफी स्टेडियम, लाहोर**

९ मार्च - फायनल - गद्दाफी स्टेडियम, लाहोर**

जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर तो दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT