Gautam Gambhir No Handshake Controversy saam tv
Sports

Gautam Gambhir : नो हँडशेक वादात नवा ट्विस्ट; पाक टीमही हैराण, गंभीरने खेळाडूंना बोलावलं अन् म्हणाला...! Video

Gautam Gambhir No Handshake Controversy: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील क्रिकेट सामन्यात नेहमीच मैदानाबाहेरील नाट्य चर्चेत असते. आशिया कपमधील सुपर फोर सामन्यातही असेच काही घडले.

Surabhi Jayashree Jagdish

  • भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्स राखून विजय मिळवला.

  • सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी हँडशेक टाळला.

  • गौतम गंभीरने अंपायरशिवाय कोणाशीही हात मिळवला नाही.

21 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळल्या गेलेल्या एशिया कप 2025 सुपर-4 मधील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर "नो हँडशेक" वादाला नवं वळण मिळालं. यावेळी चर्चेत खेळाडू किंवा आयसीसी अधिकारी नव्हते, तर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर होता.

आशिया कपममध्ये सुपर ४ च्या सामन्यात पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला लोळवलं. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र सामन्यानंतर गंभीर यांनी आपल्या खेळाडूंना पाकिस्तान टीमशी हात न मिळवता केवळ अंपायरशी हँडशेक केलं. आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गंभीर यांचा ठाम निर्णय

सामन्याआधी टॉसच्या वेळीही सूर्या कुमार यादव यांनी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हँडशेक केलं नाही. यावेळीही तो थेट प्रेझेंटर रवी शास्त्री आणि रेफरी अँडी पाइक्रॉफ्ट यांच्याकडे वळला. सामना संपल्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि पाकिस्तान खेळाडूंशी हात मिळवला नाही.

यानंतर कोच गौतम गंभीर यांनी खेळाडूंना पुन्हा मैदानावर बोलावलं आणि केवळ अंपायरशी हँडशेक करायला सांगितलं. भारतीय खेळाडूंनी तसा शिष्टाचार पाळून परत जाणं पसंत केलं. हे पाहून पाकिस्तानचे खेळाडू अवाक् झाले. दरम्यान कोच गौतम गंभीरच्या या कृत्याचं चाहत्यांकडून कौतुक होताना दिसतंय.

गंभीरची ‘फीयरलेस’ पोस्ट

सामना संपल्यानंतर गंभीरने त्याचा इन्स्टा अकांऊटवरून काही पोटो पोस्ट केलेत. यामध्ये त्याने भारतीय खेळाडूंचा फोटो शेअर केले असून केवळ एकच शब्द लिहिला – “फीयरलेस” म्हणजेच निडर.

आशिया कपपमध्ये पाकिस्तानचा दुसऱ्यांदा पराभव

या लढतीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना साहिबजादा फरहानच्या (58) खेळीच्या जोरावर 171 रन्स केले. भारताकडून शिवम दुबेने दोन, तर कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक बळी घेतला. प्रत्युत्तरात भारताने शुभमन गिल (47) आणि अभिषेक शर्मा (74) यांच्या दमदार 105 रन्सच्या भागीदारीवर भिस्त ठेवत 172 धावांचं लक्ष्य सहज पार केलं.

एशिया कप २०२५ मधील भारत-पाक सामना कुठे झाला?

दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर झाला.

सामन्यानंतर कोणाशी हँडशेक करण्यात आले?

फक्त अंपायरशी हँडशेक करण्यात आले.

गौतम गंभीरने इन्स्टाग्रामवर कोणता शब्द पोस्ट केला?

“फीयरलेस” (निडर) हा शब्द पोस्ट केला.

भारताकडून सर्वाधिक धावा कोणी केल्या?

अभिषेक शर्माने 74 धावा केल्या.

पाकिस्तानचा संघ किती धावांवर गारद झाला?

पाकिस्तानचा संघ 171 धावांवर गारद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chikhali Crime : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून १० लाखांची रोकड लंपास; चिखली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये तहसीलदाराच्या दालनातच शेतकऱ्याचा आत्महत्याची प्रयत्न

Navratri: नवरात्रीत पहिल्यांदा उपवास करताय? या चुका केल्यात तर उपवास होईल अपूर्ण

Buldhana Crime News : आश्रम शाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरण, मुख्य आरोपीला ५ वर्षांची शिक्षा, १७ जण निर्दोष

Airstrike in Pakistan : पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, ८ बॉम्ब टाकले, ३० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT