kho kho saam tv
Sports

Kho Kho: खाे-खाे महासंघाने संघातील खेळाडूंची संख्या वाढवली; एप्रिलपासून अंमलबजावणी

काही वेळेस निष्णात खेळाडूंअभावी संघास खेळावे लागायचे.

Siddharth Latkar

सातारा : गेल्या अनेक वर्षापासून खाे खाे संघटकांची असलेली मागणी भारतीय खाे खाे महासंघाने (kho kho fedreation of india) नुकतीच पुर्ण केली आहे. नव्या निर्णयानूसार आता खाे खाे संघात आता १२ ऐवजी १५ खेळाडू (15 players in kho kho team) असणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या एप्रिलपासून हाेणार आहे. नव्या निर्णयाबाबत महासंघाने देशातील सर्व खाे खाे संघटनांना कळविले आहे. (kho kho latest news)

भारतीय खो खो महासंघाची (KKFI) नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी या खेळात संघातील खेळाडूंची संख्या वाढविण्याचा विचार व्हावा अशी मागणी केली. ही मागणी करीत असताना डाॅ. जाधव यांनी सराव अथवा सामन्या दरम्यान काही वेळेला खेळाडूंना (players) दुखापत हाेते. त्यामुळे निष्णात खेळाडूंअभावी संघास खेळावे लागते असा मुद्दा उपस्थित केला.

डाॅ. जाधव यांनी मांडलेल्या मुद्यावर महासंघाने चर्चेतून संघातील खेळाडूंची संख्येत तीनने वाढ केली आहे. त्याबाबतची माहिती महासंघाने सर्व संलग्न संघटनांपर्यंत पाेहचवली. नव्या निर्णयानूसार आता खो खोचा संघ १८ खेळाडूंचा असेल. त्यात १५ खेळाडू (नऊ खेळणारे आणि सहा राखीव).

आगामी काळात सुरु हाेणा-या किशोर, किशोरी, कुमार, कुमारी आणि पुरुष, महिला (women) अशा सर्व स्पर्धांत खाे खाे संघांत १२ ऐवजी १५ खेळाडूंच्या समावेश करावा असं पत्र महासंघाने सर्व राज्य क्रीडा (sports) संघटनांना पाठविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

Kalyan: दोन गटात तुफान राडा, दगडफेक- तोडफोड अन् हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली; VIDEO व्हायरल

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: कार्यकर्त्यांवर होणाऱ्या संभाव्य खोट्या गुन्ह्यांना उत्तर देण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या नेत्याची 'अनोखी शक्कल'

SCROLL FOR NEXT