netherlands defeated south africa by 39 runs Team India Benefit in World Cup 2023 points table Saam TV
Sports

World Cup 2023: नेदरलँडच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल; टीम इंडियाचा फायदा, दक्षिण आफ्रिकेचं नुकसान

World Cup 2023 Points Table: वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मंगळवारी दुसरा मोठा उलटफेर पाहायला मिळाला. स्पर्धेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या नेदरलँड संघाने बलाढ्य अशा दक्षिण आफ्रिकेचा ३९ धावांनी दारुण पराभव केला.

Satish Daud

ICC World Cup 2023 Points Table

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मंगळवारी दुसरा मोठा उलटफेर पाहायला मिळाला. स्पर्धेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या नेदरलँड संघाने बलाढ्य अशा दक्षिण आफ्रिकेचा ३९ धावांनी दारुण पराभव केला. या पराभवामुळे क्रीडा जगतात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, नेदरलँडच्या या विजयाचा गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला असून टीम इंडियाला जबरदस्त फायदा झाला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचं मोठं नुकसान झालं आहे. (Latest sports updates)

पावसामुळे उशीरा सुरू झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बमुआने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय आफ्रिकेच्या चांगलाच अंगलट आला. नेदरलँडने धुव्वाधार फलंदाजी (Sport News) करत ४३ षटकात ८ बाद २४५ धावांपर्यंत मजल मारली.

२४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली. भन्नाट फॉर्ममध्ये असलेला क्विंटन डी कॉक २० धावा काढून माघारी परतला. त्यापाठोपाठ तेंबा बमुआ देखील बाद झाला. डेव्हिड मिलर आणि केशव महाराजने चांगली खेळी केली.

मात्र, ठराविक अंतराने विकेट्स गमावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला आणि संपूर्ण संघ अवघ्या २०७ धावांवर बाद झाला. २००७ नंतर नेदरलँडचा वनडे विश्वचषकातील हा पहिलाच विजय ठरला. त्यांच्या या विजयाने सर्वांनाच चक्रावून टाकलं. यापूर्वी २०२२ मध्ये सुद्धा नेदलँडने टी-२० विश्वचषकात आफ्रिकेचा पराभव केला होता.

नेदरलँडच्या विजयाचा टीम इंडियाला मोठा फायदा

दरम्यान, नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाला (Team India) गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. टीम इंडियाचं गुणतालिकेत अव्वल स्थान कायम आहे. जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला असता, ते अव्वल स्थानावर पोहचले असते. टीम इंडियाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असती.

मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, नेदरलँडला देखील या विजयाचा फायदा झाला आहे. या सामन्याआधी नेदरलँडचा संघ गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर होता. आता तो नवव्या क्रमांकावर पोहचला असून श्रीलंका संघाची दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

SCROLL FOR NEXT