nehal wadhera  twitter
Sports

Nehal Wadhera Six: नेहालचा एक षटकार टाटांना पडला ५ लाखांचा; वाचा काय आहे भानगड

Nehal Wadhera: सूर्यकुमार यादवसह आणखी एक खेळाडू जोरदार चर्चेत राहिला तो म्हणजे मुंबईचा युवा फलंदाज नेहाल वढेरा.

Ankush Dhavre

MI VS RCB IPL 2023: मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी २०० धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या हातून हिसकावून घेतला.

सूर्यकुमार यादवसह आणखी एक खेळाडू जोरदार चर्चेत राहिला तो म्हणजे मुंबईचा युवा फलंदाज नेहाल वढेरा.

गेल्या सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावणारा नेहाल वढेरा या सामन्यातमध्ये देखील तुफान फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. ईशान किशन बाद झाल्यानंतर त्याने मुंबईच्या इनिंगला ब्रेक न लागू देता तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली.

या खेळी दरम्यान त्याने एक षटकार मारला जो थेट कारला जाऊन लागला. या कारचं नुकसान झालं आहे मात्र एक मोठा फायदा देखील झाला आहे. (Latest sports upadates)

काय आहे भानगड?

तर झाले असे की, मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांची गरज होती. नेहाल वढेरा आणि सूर्यकुमार यादव यांची तुफान फटकेबाजी सुरु होती. त्यावेळी ११ वे षटक टाकण्यासाठी वनिंदूं हंसरंगा गोलंदाजी करण्यासाठी आला होता.

सूर्यकुमार यादवने षटकार मारून अर्धशतक पूर्ण केलं आणि स्ट्राईक नेहाल वढेराला स्ट्राईक दिली. नेहालने स्लॉग स्वीपचा फटका खेळत असा काही रॉकेट शॉट मारला. जो थेट मैदानाबाहेर उभी असलेल्या कारला जाऊन धडकला. हा शॉट इतका जोरात मारला होता की, त्या कारला लागताच कारला डेन्ट पडला.

आता मिळणार ५ लाख रुपये..

नेहाल वढेराच्या मनगटात इतकी ताकद आहे की, त्याने मारलेल्या शॉटने थेट टाटांच्या कारला डेन्ट पडला. टाटा हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहे. ठरलेल्या नियमानुसार, जर कुटल्याही फलंदाजाने त्या कारला चेंडू मारला.

तर टाटा टियागो ईव्ही गरिबांना ५ लाख रुपयांची मदत करणार आहे. आता नेहाल वढेराने मारलेल्या षटकारमुळे कर्नाटकातील कॉफीच्या बागांची जैवविविधता वाढवण्यासाठी पाच लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Eye Care Tips: उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

मोठी बातमी! फरार सत्ताधारी आमदाराच्या आवळल्या मुसक्या; अत्याचार प्रकरणी पोलिसांची थेट दुसऱ्या राज्यात घुसून कारवाई

Kharat Case : मुख्यमंत्री फडणवीसांची खुर्ची घालवण्यासाठी अघोरी पूजा; ३८ आमदारांनी खरातकडे बोट कापलं, महाराष्ट्राला हादरवणारे दावे

Ashok Kharat: अशोक खरातचं पहिलं कांड; २००७मध्ये पत्रकाराला संपवलं; जितेंद्र आव्हाडांनी उघडकीस आणलं भोंदू बाबानं घडवलेलं हत्याकांड

कुठे पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग, कुठे सरकारी कार्यालये बंद! आखाती युद्धामुळे जगात लॉकडाऊनची स्थिती

SCROLL FOR NEXT