MI VS RCB Turning Points: मुंबईने चूक केली पण आरसीबीला संधी साधता आली नाही? हे होते MI vs RCB सामन्यातील टर्निंग पॉइंट

MI VS RCB: या सामन्यातील टॉप ५ पॉईंट्स ज्यामुळे हा सामना मुंबईच्या दिशेने फिरला.
MI VS RCB
MI VS RCBSaam Tv

IPL 2023: मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जोरदार कामगिरी करत ६ गडी राखून विजय मिळवला. या जोरदार विजयासह टॉप ४ मधून बाहेर असलेला मुंबईचा संघ आता तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

मुंबईला या सामन्यात २०० धावांची गरज होती. हे आव्हान मुंबई इंडियन्स संघाने अवघ्या १६ षटकात पूर्ण करत विजय मिळवला आहे. या सामन्यात एक वेळ अशी देखील आली होती. जेव्हा असे वाटत होते की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हा सामना जिंकेल.

मात्र त्यानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केले आणि विजय मिळवला. चला तर पाहूया या सामन्यातील टॉप ५ पॉईंट्स ज्यामुळे हा सामना मुंबईच्या दिशेने फिरला.

MI VS RCB
MI vs RCB: मुंबईने आरसीबीविरुद्ध उतरवला हुकमी एक्का! विराट, डू प्लेसिसवर रोहितचा जालीम उपाय

१) अंतिम षटकांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजांचे सरेंडर:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजांनी या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. १२ वे षटक सुरु असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची धावसंख्या १३६ होती. मात्र त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ दू प्लेसिस बाद होऊन माघारी परतले. दोघे बाद झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या धावांची गती कमी झाली. सुरुवातीच्या ७४ चेंडूंमध्ये १३६ धावा करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला शेवटच्या ४६ चेंडूंमध्ये ६३ धावा करता आल्या.

२) ईशानची आक्रमक सुरुवात:

मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून ईशान किशनने चांगली सुरुवात करून दिली होती. ईशानने या डावात २१ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची खेळी केली. यासह त्याने रोहित शर्मासह महत्वपूर्ण भागीदारी देखील केली. (Latest sports updates)

MI VS RCB
IPL 2023 Cheerleaders: आता तर हद्दच पार! सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाने चियर लीडर सोबत केलं लाजिरवाणं कृत्य ; VIDEO व्हायरल

३) वानखेडेवर सूर्याच्या फलंदाजीचे वादळ :

सूर्यकुमार यादव या सामन्यात जोरदार फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत, चौफेर फटकेबाजी केली. त्याने छोट्या बाउंड्रीचा चांगलाच फायदा घेतला. ३५ चेंडूंचा सामना करत त्याने ८३ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि ६ षटकार मारले. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली आहे.

४) वढेराची अप्रतिम खेळी:

मुंबई इंडियन्स संघातील फलंदाज तिलक वर्मा बाहेर असल्याने नेहाल वढेराला संघात खेळण्याची संधी दिली जात आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेत आपली निवड ही योग्यच आहे, हे तो टीम मॅनेजमेंटला दाखवून देत आहे. सलग दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली आहे. या डावात त्याने ३४ चेंडूंचा सामना करत नाबाद ५२ धावांची खेळी केली. तर तिसऱ्या विकेटसाठी त्याने सूर्यकुमार यादव सोबत मिळून १४० धावांची भागीदारी केली.

५) इम्पॅक्ट प्लेअरचा डाव फसला:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या सामन्यात केदार जाधवला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवलं होतं. केदार जाधवने १२ चेंडूंचा सामना करत १२ धावा केल्या. त्याला फिनीशर म्हणून संधी दिली गेली होती. मात्र तो असं करण्यात अपयशी ठरला. जर त्याने वेगाने धावा केल्या असत्या तर संघाच्या धावसंख्येत आणखी भर पडली असती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com