Rohit Sharma चं IPL मध्येही 'द्विशतक', Mumbai Indians कडून खेळताना केला मोठा विक्रम

Rohit Sharma double century in IPL: गेल्या 10 वर्षांपासून 'हिटमॅन' मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनली.
Rohit Sharma double century in IPL
Rohit Sharma double century in IPLSAAM TV

Rohit Sharma 200 IPL Match : आयपीएल 2023 चा 45 वा सामना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी खूप खास होता. मुंबई इंडियन्सच्या निळ्या जर्सीतील रोहित शर्माचा हा २०० वा सामना ठरला. 2011 पासून रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. गेल्या 10 वर्षांपासून 'हिटमॅन' मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनली.

रोहितने ठोकलेत 200 षटकार

मुंबई इंडियन्सपूर्वी रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सचा भाग होता. आयपीएलमध्ये 6,000 हून अधिक धावा करणाऱ्या या हिटमॅनने मुंबई इंडियन्सला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ बनवले. त्याचबरोबर या लीगमध्ये क्रिकेटपटू म्हणून रोहित शर्माने सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याच्या नावावर 250 हून अधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड आहे.

याशिवाय कर्णधार रोहित शर्मानेही आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे. त्याने 1012 मध्ये KKR विरुद्ध 109 धावांची इनिंग खेळली होती. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 5 षटकार मारले होते.

Rohit Sharma double century in IPL
PBKS vs MI Match Result: नाद करा पण मुंबईचा कुठं! वानखेडेवरील पराभवाचा बदला मोहालीत घुसून घेतला

रोहितची बॅट यंदाच्या मोसमात शांत

रोहित शर्माच्या IPL 2023 च्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 8 सामन्यात 181 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 25.86 आहे. रोहितची सर्वोच्च धावसंख्या 65 आहे जी त्याने 11 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DC) केली होती. आज झालेल्या सामन्यात तर त्याला खातेही उघडता आले नाही.

2011 मध्ये मुंबईशी जोडला गेला रोहित

रोहित शर्माने आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध कारकिर्दीची सुरुवात केली. 2008 ते 2010 पर्यंत रोहित डेक्कन चार्जर्सशी संबंधित होता. यानंतर 2011 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहितला 9.2 कोटी रुपये खर्चून आपल्या संघात समाविष्ट केले. त्यानंतर गेली 12 वर्षे तो आतापर्यंत संघाशी जोडला गेला आहे.

मुंबईसाठी 200 सामने खेळणारा पहिला भारतीय

किरॉन पोलार्डने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग या दोन्हीमध्ये मुंबईसाठी एकूण 211 सामने खेळले आहेत. यात आयपीएलमधील 189 सामने आणि चॅम्पियन्स लीगमधील 22 सामने आहेत. त्याच्यानंतर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आयपीएलमध्ये 191 सामने आणि चॅम्पियन्स लीगमधील 9 सामने असे 200 सामने मुंबई इंडियन्सच्या जर्सीत खेळले आहेत. अशाप्रकारे त्याने मुंबई इंडियन्ससाठी 200 सामन्यांचा आकडा पूर्ण केला आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. दुसरीकडे पोलार्ड आणि रोहितनंतर 158 सामन्यांसह मुंबईसाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हरभजन सिंग तिसऱ्या स्थानावर आहे. (IPL 2023)

Rohit Sharma double century in IPL
Ayush Badoni Celebration: लखनऊचे इतर फलंदाज ढेर, एकटा बदोनी ठरला शेर, अर्धशतक झळकावताच केलं हटके सेलिब्रेशन

विराट-धोनीच्या क्लबमध्ये सामील होणार

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 2021 साली IPL मध्ये एका संघासाठी दोनशे किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर एमएस धोनीने चेन्नईसाठी 200 सामने पूर्ण केले. आता तो IPL मध्ये 200 सामन्यात कर्णधार बनणारा पहिला खेळाडू बनला आहे. (Latest Sports News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com