Ayush Badoni Celebration: लखनऊचे इतर फलंदाज ढेर, एकटा बदोनी ठरला शेर, अर्धशतक झळकावताच केलं हटके सेलिब्रेशन

Ayush Badoni: या डावात अर्धशतक झळकावणारा आयुष बदोनी हटके सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे.
ayush badoni
ayush badonitwitter
Published On

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार सुरू आहे. पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने १९.२ षटक अखेर ७ गडी बाद धावा १२५ धावा करता आल्या आहेत. दरम्यान पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला आहे. या डावात अर्धशतक झळकावणारा आयुष बदोनी हटके सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे.

ayush badoni
MI vs RR IPL Match Result: यशस्वीची शतकी खेळी ठरली व्यर्थ, मुंबईने राजस्थानवर मात करत रोहितला दिलं अनोखं बर्थडे गिफ्ट

आयुष बदोनीची वन साइड बॅटिंग

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. मनन वोहरा १० तर आक्रमक फलंदाज काइल मेयर्स अवघ्या १४ धावा करत माघारी परतला.

तर निकोलस पूरनने २० धावांचे योगदान दिले. त्याला देखील मोठी खेळी करता आली नाही. दरम्यान युवा फलंदाज आयुष बदोनीने संघाची जबाबदारी आपल्या खांदयावर घेत, ३३ चेंडूंचा सामना करता ५९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले. दरम्यान अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो फ्लाईंग किस करताना दिसून आला आहे. (Latest sports updates)

चेन्नईची इकोनॉमिकल गोलंदाजी..

या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून मोईन अलीने ४ षटकात १३ धावा खर्च करत २, महिश थिक्षणाने ३७ धावा खर्च करत २, तर मथिशा पथिरानाने देखील अवघ्या २२ धावा देत २ गडी बाद केले. अप्रतिम गोलंदाजीमुळे लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

ayush badoni
Who Is Naveen Ul Haq: Virat सोबत पंगा घेणारा अवघ्या २३ वर्षांचा Naveen आहे तरी कोण? यापूर्वी देखील मैदानात केलाय राडा..

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

लखनऊ सुपर जायंट्स :

काइल मेयर्स, मनन वोहरा, करण शर्मा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पांड्या (क), कृष्णप्पा गौथम, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान

चेन्नई सुपर किंग्ज :

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चहर,मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, महिश थिक्षणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com