neeraj chopra saam tv
Sports

Neeraj Chopra Mother: पाकिस्तानचा खेळाडू जिंकला असता तर? प्रश्नावर नीरजच्या आईचे मन जिंकणारे उत्तर

Neeraj Chopra Mother News: या प्रश्नावर अरशद नदीमने मन जिंकणारे वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Neeraj Chopra Mother Statement On Arshad Nadeem:

भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राने भारताची मान पून्हा एकदा अभिमानाने उंजावली आहे. नुकताच संपन्न झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने भारताला भालाफेक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

तर अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या अरशद नदीमला रौप्यदकावर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान नीरज चोप्राच्या आईला पाकिस्तानच्या अरशद नदीमबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यानी मन जिंकणारे उत्तर दिले आहे.

बीबीसीच्या वृत्तानूसार नीरज चोप्राच्या आईने म्हटले की, 'मैदानावर असताना सर्वच खेळाडू असतात. कोणी ना कोणी जिंकणार आहेच. यात पाकिस्तान आणि हरियाणा असं काही नाही. ही आनंदाची बाब आहे. पाकिस्तानचा खेळाडू जिंकला असता तरी तितकाच आनंद झाला असता. नीरज जिंकलाय तरी तितकाच आनंद होतोय.' भारताला पदक जिंकून देणाऱ्या नीरजने ८८.१७ मीटर लांब भाला फेकला. तर अरशद नदीमने ८७.८२ मीटर लांब भाला फेकून रौप्यपदकाला गवसणी घातली. (Latest sports updates)

अंतिम फेरीत ३ भारतीय खेळाडूंचा समावेश...

वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या भालाफेक इव्हेंटच्या अंतिम फेरीत १२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ज्यात नीरज चोप्रासह ३ भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

नीरजने बाजी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली तर, किशोर जेनाने ८४.७७ मीटर लांब भाला फेकून पाचव्या स्थानी मजल मारली. तर ८४.१४ मीटर लांब भाला फेकणाऱ्या डिपी मनूने सहावं स्थान गाठलं.

भारताकडून नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई केली. तर काही खेळाडूंचं पदक जिंकण्याचं स्वप्न हुकलं आहे.

भारताकडून अमोज जेकब, राजेश रमेश, मोहम्मद अनस याहिया आणि मोहम्मद अजमल वरियाथोडी यांनी 4x400 रिले धावण्याच्या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत भारतीय संघाच्या पदरी निराशा पडली आहे.

कारण भारतीय संघ ५ व्या स्थानी राहिला आहे. तर धावपटू पारूल चौधरीने ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडत ११ वे स्थान पटकावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

मुंबई लोकलमध्ये 'रडू नको बाळा…'वर तरुणीचा जबरदस्त डान्स; VIDEO तुफान व्हायरल

Horoscope Today : विनाकरण कटकटी मागे लागतील, अफवा उठतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT