neeraj chopra  saam tv
क्रीडा

Neeraj Chopra Ranking: गोल्डन बॉय Neeraj Chopra ची विश्वविक्रमी कामगिरी! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

Neeraj Chopra World Athletics Ranking: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताचं नाव जगात गाजवलं आहे

Ankush Dhavre

Neeraj Chopra: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताचं नाव जगात गाजवलं आहे. टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची कमाई करून देणाऱ्या नीरज चोप्राने आता मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

त्याने २२ मे रोजी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत भालाफेकच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे.

वर्ल्ड अॅथलेटिक्सने नुकताच यादी जाहीर केली आहे. पुरुषांच्या भालाफेकपटुंच्या यादीत भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा पहिल्या स्थानी पोहोचला आहे. ही कामगिरी करत त्याने इतिहासाला गवसणी घातली आहे.

वर्ल्ड अॅथलेटिक्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत नीरज चोप्राने १४५५ पॉईंट्सची कमाई केली आहे. यासह त्याने विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सला मागे सोडलं आहे. नीरज चोप्रा हा अँडरसन पीटर्सपेक्षा २२ पॉईंट्सने पुढे आहे. अँडरसन पीटर्स हा १४३३ पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. टॉप - ४ खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा देखील समावेश आहे.

या यादीत पहिल्या स्थानी नीरज तर दुसऱ्या स्थानी पीटर्स आहे. तर १४१६ पॉईंटस सह तिसऱ्या स्थानी चेक रिपब्लिकचा जेकब वडलेज्च आहे. १३८५ पॉईंट्ससह जर्मनीचा ज्युलियन वेबर चौथ्या स्थानी आहे. १३०६ पॉईंट्ससह अर्शद नदीम पाचव्या स्थानी आहे. नीरज चोप्रा आणि नदीमच्या रँकिंगमध्ये खूप फरक आहे. (Latest sports updates)

हे आहेत टॉप ५ अॅथलिट

नीरज चोप्रा (भारत) - १४५५ पॉईंट्स

अँगरसन पीटर्स (ग्रेनाडा) - १४३३ पॉईंट्स

जाकुब वडलेच (चेक प्रजासत्ताक) - १४१६ पॉईंट्स

ज्युलियन वेबर (जर्मनी) १३८५ पॉईंट्स

अर्शद नदीम (पाकिस्तान) - १३०६ पॉईंट्स

नीरज चोप्राने २०२३ वर्षाची सुरुवात डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक मिळवून केली होती. या स्पर्धेत त्याने विक्रम ८८.६७ मीटर भाला फेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. आता तो नेदरलँडच्या हेंगलोमध्ये खेळताना दिसून येणार आहे.

ही स्पर्धा ४ जून रोजी सुरु होणार आहे. त्यानंतर १३ जून पासून फिनलॅंडमध्ये सुरु होणाऱ्या नूरमी गेम्समध्ये देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT