neeraj chopra saam tv
क्रीडा

Neeraj Chopra Net Worth: गोल्डन बॉय नीरज चोप्राची एकूण संपत्ती किती?

Ankush Dhavre

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतीय फॅन्स गाढ झोपेत असताना भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदकावर निशाणा साधला. नीरजला सुवर्ण पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र फायनलमध्ये अर्शद नदीमने बाजी मारली आणि भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

सुरुवातीचा थ्रो फाऊल झाल्यानंतर नीरज चोप्राने ८९.४५ मीटर लांब थ्रो केला. हा त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर थ्रो केला. या ऑलिम्पिक रेकॉर्ड ब्रेकिंग थ्रो ने त्याला सुवर्ण पदक जिंकून दिलं.

नीरज चोप्राचा जन्म २४ डिसेंबर १९९७ रोजी हरियाणातील पानिपत शहरातील खंडरा गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नीरजला आई वडिलांनी सपोर्ट केला.

नीरज चोप्राचं शिक्षण किती?

क्रीडा प्रकारात पदकांची रांग लावणारा नीरज चोप्रा अजूनही शिकतोय. त्याने सुरुवातीचं शिक्षण आपल्या गावातून पूर्ण केलं. सध्या तो पंजाबच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून आपलं बीएचं शिक्षण पूर्ण करतोय.

नीरज चोप्राची नेटवर्थ किती?

नीरज चोप्राची एकूण नेट वर्थ (जुलै २०२४ पर्यंत) ४.५ मिलियन इतकी होती. म्हणजेच भारतीय चलनात त्याची नेट वर्थ एकूण ३७.६ कोटी रुपये इतकी आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्याची ब्रँड व्हॅल्यू झपाट्याने वाढली. तो jsw sports , limca, nike,byju, eveready, omega, Samsung सारख्या मोठ्या ब्रँड्सचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.

माध्यमातील वृत्यांमध्ये असा दावा केला जातोय की, त्याची महिन्याची इन्कम ही ३० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे वर्षाला ४ कोटी रुपये कमावतो. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला होता. बीसीसीआय, हरियाणा सरकार , भारतीय रेल्वे, भारत सरकार आणि चेन्नई सुपर किंग्जने त्याला बक्षीस म्हणून कोट्यावधी रुपये दिले होते.

कार कलेक्शन

नीरज चोप्राकडे range rover, Ford Mustang GT, Mahindra Thar आणि टोयोटा फॉर्चूनरसारख्या आलिशान गाड्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT