Neeraj Chopra News: नीरज चोप्राचं गोल्ड मेडल का हुकलं? सर्वात मोठं कारण आलं समोर

Neeraj Chopra at Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये नीरज चोप्रा याला सुवर्णपदकानं हुलकावणी दिली. त्यामागचं मोठं कारण आता समोर आला आहे.
Neeraj Chopra missed Gold Medal | पॅरिस ऑलिंपिकच्या फायनलमध्ये नीरज चोप्रानं शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण गोल्ड मेडल हुकलं
Neeraj Chopra missed Gold Medal | पॅरिस ऑलिंपिकच्या फायनलमध्ये नीरज चोप्रानं शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण गोल्ड मेडल हुकलं PTI
Published On

पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदकानं हुलकावणी दिली. भालाफेकीत अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीम यानं ९२.९७ मीटरच्या विक्रमी भालाफेकीसह नीरजला सुवर्णपदकापासून दूर ठेवलं. टोकियो ऑलिंपिक चॅम्पियन नीरजनं शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण त्याला ८९.४५ मीटरची सर्वश्रेष्ठ कामगिरी करता आली. अखेर रौप्यपदकावरच त्याला समाधान मानावं लागलं.

टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचं पॅरिस ऑलिंपिक चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. भालाफेकीत त्यानं भारताला रौप्यपदक जिंकून दिलं. त्याचा प्रतिस्पर्धी अर्शद नदीमनं सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. नीरज चोप्रा याला सुवर्णपदकानं हुलकावणी दिली असून, त्यामागचं सर्वात मोठं कारण समोर आलं आहे.

अंतिम फेरीच्या निकालानंतर नीरज चोप्रानं स्वतः यामागचं कारण सांगितलं आहे. तो दुखापतीशी झुंजत असतानाच सुवर्णपदकासाठी लढत होता. ग्रोइन इंज्युरीमुळं त्याला सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. आगामी काळात तो मैदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.

नीरज चोप्रा मैदानापासून राहणार दूर

भालाफेकीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा अर्शद नदीम यानं नीरज चोप्राला मागं टाकत सुवर्णपदक जिंकलं. नीरजची ऑलिंपिकमधील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी असली तरी, त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. यामागचं आता मोठं कारण समोर आलं आहे. अंतिम फेरीत त्याला हा सुवर्णवेध घेता आला नाही. नीरजचे चार प्रयत्न फोल ठरले. तर अर्शदनं दुसराच थ्रो ९२.९७ मीटरचा फेकला. त्यानंतर सर्वच प्रतिस्पर्धींवर दबाव आला. त्यात नीरज चोप्राही होता. नीरजनं दुखापतग्रस्त असूनही नदीमला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला.

Neeraj Chopra missed Gold Medal | पॅरिस ऑलिंपिकच्या फायनलमध्ये नीरज चोप्रानं शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण गोल्ड मेडल हुकलं
Neeraj Chopra Mother Statement: 'नीरज जिंकल्याचा मला आनंद, अर्शदही माझ्या मुलासारखाच..' नीरजच्या आईंची पहिली प्रतिक्रिया

या सामन्यानंतर त्यानं माध्यमांशी बोलताना कारण सांगितलं. लवकरच त्याला डॉक्टरकडे जावं लागणार आहे. त्याला शस्त्रक्रिया करावी लागू शकते. त्यामुळं मैदानापासूनही दूर राहावं लागण्याची शक्यता आहे. आगामी काही काळासाठी त्याला कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. याच दुखापतीमुळं ऑलिंपिकपूर्वी काही स्पर्धांपासून दूर राहावं लागलं होतं.

नीरज चोप्राची आई काय म्हणाली?

नीरज चोप्रानं रौप्यपदक जिंकल्यानंतर त्याच्या आईनंही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यासाठी रौप्यपदकही सुवर्णपदकासारखंच आहे. या कामगिरीनं संपूर्ण कुटुंब आनंदी आहे, असं तिनं सांगितलं.

Neeraj Chopra missed Gold Medal | पॅरिस ऑलिंपिकच्या फायनलमध्ये नीरज चोप्रानं शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण गोल्ड मेडल हुकलं
Arshad Nadeem Throw: हाच तो क्षण ज्यामुळे नीरज चोप्राचं गोल्ड हुकलं! पाहा अर्शद नदीमचा 92.97 मीटरचा थ्रो - VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com