'नीरज चोप्रा'चा मोठा सन्मान! 7 ऑगस्ट ला साजरा होणार 'भालाफेक दिन' Twitter/ @Neeraj_chopra1
क्रीडा

'नीरज चोप्रा'चा मोठा सन्मान! 7 ऑगस्ट ला साजरा होणार 'भालाफेक दिन'

121 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हे नाव आता प्रत्येक भारतीयाच्या मुखात आहे.

वृत्तसंस्था

121 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हे नाव आता प्रत्येक भारतीयाच्या मुखात आहे. ऑलिम्पिकमध्ये शेवटचं सुवर्ण पदक भारताला 2008 च्या बिजींग ऑलिम्पिकमध्ये मिळाले होते. त्यानंतर 7 ऑगस्ट 2021 रोजी नीरजने ऐतिहासीक कामगिरी करत भारतला ऑलिम्पिक 2020 मध्ये पहिले सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकून दिले. याच सुवर्ण पदाकाच्या विजयानंतर निरजवर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. नीरजच्या बक्षिसांमध्ये आता अजून एकाची भर पडली आहे. एथलॅटीक्स फेडरेशन ऑफ इंडीयाने 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.

नीरजवर कोट्यवधींचे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले होते. याच रोख रकमेसह, गाडी, घर बनवण्याकरिता मोफत सिंमेट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिस जाहिर करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टोक्यो ओलिम्पिक मधील पदक विजेत्या खेळाडूंना रोख रकमेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये नीरज चोप्राला १ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर रौप्य पदक विजेत्यांना ५० लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना २५ लाख दिले जाणार आहेत.

दरम्यान, भारताचा स्टार भालाफेकपटू निरज चोप्राने (Neeraj Chopra) भारतासाठी पहिलं वहिलं सुवर्ण (First Gold Medal At Tokyo) पदक जिंकले आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर भाला फेकत विक्रम केला होता. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 87.58 मीटर भाला फेकला आणि तिथेच त्याने सुवर्णपदकाला गवसनी घातली. चौथ्या प्रयत्नात निरज चोप्राचा फाऊल झाला होता. टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics) मध्ये भारताकडून सुवर्ण पदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला होता. या अगोदर बिजींग ऑलिम्पिकमध्ये 2008 मध्ये अभिनव बिंद्राने (Abhinav Bindra) सुवर्ण पदक जिंकले होते. निरजने सुवर्ण पदक जिंकून भारताचे आणि कुंटुंबाचे नाव रोशन केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून युगेंद्र पवार आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT