virat kohli and naveen ul haq saam digital
Sports

Naveen Ul Haq On Virat Kohli: गंभीरला Legend म्हणत नवीनने विराट बाबत केलं मोठं वक्तव्य

Naveen Ul Haq On Virat Kohli kohli Chants: विराट कोहली सोबत झालेल्या वादानंतर नवीन उल हक प्रत्येक सामन्यात चर्चेचा विषय ठरतोय

Ankush Dhavre

Naveen Ul Haq: विराट कोहली सोबत झालेल्या वादानंतर नवीन उल हक प्रत्येक सामन्यात चर्चेचा विषय ठरतोय. विराट कोहलीचे फॅन्स त्याचा पाठलाग सोडण्याचं काही नाव घेत नाहीये. ज्या ज्या मैदानावर नवीन उल हक खेळण्यासाठी जातोय, त्या मैदानावर फॅन्स हजेरी लावून त्याला ट्रोल करत आहेत.

असेच काहीसे चित्र बुधवारी झालेल्या सामन्यात देखील पाहायला मिळाले होते. नवीन उल हकने अप्रतिम गोलंदाजी करत रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीनला बाद करत पॅव्हेलियनची वाट दाखवली.

या फलंदाजांना बाद करत तो हटके सेलिब्रेशन करताना दिसून आला होता. दरम्यान फॅन्स कोहली.. कोहलीचे नारे देताना दिसून आले होते.

एखाद्या खेळाडूला जेव्हा सामना सुरु असताना ट्रोल केलं जातं त्यावेळी त्याची कामगिरी खालावते. मात्र नवीन उल हकचं उलट झालं आहे. मैदानात कोहली कोहलीचे नारे ऐकून त्याचा आत्मविश्वास वाढतो. असं त्याचं म्हणणं आहे.

सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत त्याने म्हटले की, 'मैदानावर जेव्हा कोहली कोहलीचे नारे दिले जातात ते मला आवडतं. मला माझ्या संघासाठी आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.'

तसेच तो पुढे म्हणाला की,'तसं पाहिलं तर मी बाहेर कोण काय बोलतंय यावर लक्ष देत नाही. मी केवळ क्रिकेट आणि क्रिकेटच्या प्रक्रियेवर लक्ष देत असतो. क्रिकेट फॅन्स काय म्हणताय याचा मला काही फरक पडत नाही.

एक प्रोफेशनल खेळाडू असल्यामुळे आपल्या या गोष्टी आपल्या पद्धतीने हाताळाव्या लागतात. जेव्हा तुम्ही संघासाठी चांगली कामगिरी करत नास्ता, तेव्हा फॅन्स असं करतात. मात्र जेव्हा तुम्ही संघासाठी चांगली कामगिरी करत असतात, तेव्हा हेच फॅन्स तुमच्या नावाचे नारे देत असतात. हा खेळाचा एक भाग आहे. (Latest sports updates)

तसेच गौतम गंभीर बद्दल बोलताना तो म्हणाला की, 'मेंटॉर, कोच आणि खेळाडूंनी आपल्या खेळाडूंना बॅक करायला हवं. मी प्रत्येक खेळाडूसाठी मैदानात उभा राहील. मी अशी अपेक्षा करतो की माझ्यासोबतही असंच व्हावं. ते (गौतम गंभीर) भारताचे दिग्गज खेळाडू आहेत. भारतात त्यांना खूप मान आहे. एक मेंटॉर म्हणून, एक खेळाडू म्हणून, एक कोच म्हणून मी त्यांचा आदर करतो. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT