Bharat Jadhav
पनीरपासून कायमच पनीर टिक्का, पनीर बटर मसाला किंवा पनीर बिर्याणी बनतात. पण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही झटपट पनीर खिमा मसाला बनवू शकता.
हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होत असतो. दरम्यान पनीरपासून बनवलेले पदार्थ सगळे जण आवडीने खातात. त्यामुळे पनीर खिमा मसालाही प्रत्येकाला आवडेल. गरमागरम चपाती किंवा बटर रोटी सोबत पनीर खिमा खाल्ला तर तुम्ही हॉटेलला जाणं विसरून जाल.
पनीर, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट,बेसन, धणे, जिरं पावडर, लिंबाचा रस आणि खडा मसाला.
पनीर खिमा मसाला बनवायचा असेलस तर सर्वप्रथम पनीर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर किसणीने बारीक किसून घ्या.
दुसरीकडे कढईमध्ये तेल आणि बटर गरम करून त्यात सर्व खडे मसाले टाका. ते लाल होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून ते शिजवा.
त्यात चवीनुसार मीठ टाकावे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात अद्रक लसूण मिरची पेस्ट घालून ते परतवून घ्या.
मसाले व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात गरम पाणी घाला. त्याची उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून सर्व साहित्य शिजू द्या.त्यानंतर त्यात किसून घेतलेले पनीर घालून मिक्स करा. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा त्यानंतर वरून तूप आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.