बाईकची मागची सीट उंच का असते? तुम्हाला महितीये का उत्तर?

Bharat Jadhav

मागील सीट उंच असते

अनेक बाईकमध्ये मागची सीट पुढच्या सीटपेक्षा थोडी उंच असते. बरेच लोक याबद्दल तक्रार करतात. सीट उंच असल्यानं बाईकवर बसणे कठीण होत असते.

कारण काय?

पण बाईकच्या मागचे सीट उंच असण्यामागे काही कारणे आहेत. चला जाणून घेऊया

दैनंदिन कामांसाठी बाईकचा उपयोग

बाईकमुळे आपली दैनंदिन कामे खूप सोपी होतात. म्हणजे मार्केट जाणं. दुसऱ्या गावी जाणं आधी गोष्टींसाठी बाईकचा उपयोग होतो. त्यामुळे कंपन्या लोकांच्या आरामाची काळजी घेतात. त्यांना त्रास जाणवून नये म्हणून बाईकची उंची आणि रुंदीकडे देखील विशेष लक्ष देतात.

संतुलन राखणे

बाईकचे दोन्ही चाकांवर योग्य संतुलन राखणे अत्यंत महत्वाचे आहे. पुढच्या आणि मागच्या दोन्ही टायर्सवरील वजन समान असले पाहिजे. त्यामुळे जेव्हा मागील सीट उंच केले जाते तेव्हा मागे बसणाऱ्या व्यक्तीचं वजन हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या जवळ असते. त्यामुळे बाईक संतुलित राहण्यास मदत मिळते.

आरामदायी राइडचा आनंद

मागील उंच सीटवर बसलेला व्यक्ती थोडासा पुढे झुकत असतो. यामुळे वजन मोटरसायकलच्या गुरुत्वाकर्षण केंद्राच्या जवळ येते आणि स्थिरता सुधारते. यामुळे हवेचा दाब देखील कमी होतो आणि प्रवास अधिक आरमदायी होत असतो.

लांब पल्ल्याचा प्रवासही होतो सुपर

बाईकचे सस्पेंशन जास्त उंचीवरही चांगले काम करते. यामुळे रस्त्यावरील गचके कमी लागतात. लांब पल्ल्याच्या प्रवासात आराम मिळतो.

हेही वाचा

येथे क्लिक करा

बाईकची मागची सीट उंच का असते? तुम्हाला महितीये का उत्तर?