Shreya Maskar
भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. येथे तुम्हाला विविध प्राणी-पक्षी पाहायला मिळतील.
सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये आहे. वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्याच्या सीमांवर ‘सागरेश्वर’ वसलेले आहे.
सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे हरिणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. कारण येथे हरिणांची मोठी संख्या पाहायला मिळते.
सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य वनसंपदा संवर्धनाचा एक उत्तम आदर्श आहे. सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात अंजन, धावडा, चंदन, बाभूळ, निलगिरी यांसारख्या वनस्पती आढळतात.
वन्यजीव अभयारण्याजवळ छोटे धबधबे , प्राचीन हेमाडपंती मंदिरे पाहायला मिळतात. हे पाहण्यास पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
वन्यजीव अभयारण्यात गेल्यावर तुम्हाला जंगल सफारी देखील करता येते. लहान मुलांना येथे खूप आनंद मिळेल. वन्य प्राण्यांसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात मोर, ससा, कोल्हा, लांडगा असे प्राणी आणि मोर, पोपट, मैना, सुगरण, सुतारपक्षी आढळतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.