
LSG VS MI, IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगिरी करत ८१ धावांनी विजय मिळवला आहे.
आता अंतिम फेरीत जाण्यासाठी मुंबईचा पुढील सामना गुजरात टायटन्स संघासोबत रंगणार आहे. आकाश मधवालच्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. दरम्यान ५ विकेट्स घेत त्याने मोठे विक्रम मोडून काढले आहेत.
१) मोडला १३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड..
आकाश मधवाल हा प्लेऑफच्या सामन्यांमध्ये ५ विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा गोलंदाज डग बोलिंजरने अप्रतिम गोलंदाजी करत १३ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते. ही प्लेऑफच्या सामन्यांमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.
२)अनिल कुंबळेच्या विक्रमाची केली बरोबरी..
आकाश मधवालने ५ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्त सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी माजी भारतीय गोलंदाज अनिल कुंबळे यांनी २००९ मध्ये ५ धावा खर्च करत ५ गडी बाद केले होते. (Latest sports updates)
बेस्ट इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करणारे गोलंदाज
५/५ (इकॉनॉमी रेट:१.४) - आकाश मधवाल ,मुंबई विरुद्ध लखनऊ , चेन्नई, २०२३
५/५ (इकॉनॉमी रेट: १.५७) - अनिल कुंबळे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, केप टाऊन, २००९
५/१० (इकॉनॉमी रेट: २.५०) - जसप्रीत बुमराह, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई डी वाय पाटील,२०२२
३) सलग ४ विकेट्स घेणारा मुंबईचा दुसराच गोलंदाज..
आयपीएल स्पर्धेत सलग ४ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आकाश मधवालचा समावेश झाला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील ४ गडी बाद केले होते. असाच कारनामा यापूर्वी मुनाफ पटेलने देखील केला होता. आयपीएल स्पर्धेत सलग ४ विकेट्स घेणारा तो मुंबईचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
अनकॅप्ड गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी..
अनकॅप्ड खेळाडू कडून केली गेलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
५/५ - आकाश मधवाल,चेन्नई, २०२३
५/१४- अंकित राजपूत, हैदराबाद, २०१८
५/२० - वरुण चक्रवर्ती, अबू धाबी, २०२०
आयपीएल स्पर्धेत गोलंदाजी करताना सर्वोत्तम कामगिरी..
अल्झारी जोसेफ: ३.४-१-१२-६ (मुंबई विरुद्ध सनरायझर्स) २०१९
सोहेल तन्वीर: ४.०-१४-४( राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज), २००८
अॅडम झाम्पा:४.०- १९-६ (सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स) २०१६
अनिल कुंबळे: ३.१-१-५-५ (आरसीबी वि रॉयल्स) २००९
आकाश मधवाल: ३.३-५-५ (मुंबई वि सुपर जायंट्स) २०२३
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.